बाल गणेश मंडळाने केली भजन संध्यातून सामाजिक जनजागृती

घाटंजी तालुका प्रतिनिधी –
सलग 4 वर्ष जिल्हा पातळीवर सार्वजनिक गणेश स्थापणा कार्यक्रमात विविध सामाजिक व लोकजागृती उपक्रम,देशभक्ती जागृती व बेटी बचाव बेटी पढओ कार्यक्रम,नेत्र तपासणी शिबारा सारखे कार्यक्रम आयोजित करुन बाल गणेश मंडळ नेहरू नगर घाटंजी या मंडळाने पारितोषिक पटकावले यंदा यादा या गणेश मंडळाचे 38 वे वर्ष असून त्यानित्याने मंडळाच्या वतीने भजन संध्यातून जनजागृती,ग्रामस्वच्छता,देशहित, व्यसनमुक्ती यासारखी भजनाची मैफील रंगवत समाज प्रबोधनाचे उदिष्ट हाती घेत गणेश उत्सव साजरा केला त्यासाठी राष्ट्र निर्माण विचारधारा संच व गजेंद्र ढवळे सरांचे भजनितून गणेश उत्सव काळात खास जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास यशस्वितेसाठी मंडळ अध्यक्ष सचिन कर्णेवार,उपआउओम ढवळे,अजू माकडवार,मंदार भुसारी,भुषण तोंडेरे,जितु बुल्ले, सुरज सिरसकार,नितीन ढवळे,योगेश ढवळे,गोलू,रवि ढवळे, भुसारी,ईशांत खांडरे,निखील तोंडेर,पप्पु ढवळे,सोनु भुसारी, आयुष कर्णेवार,कार्तिक बूल्ले तथा समस्त सदस्य गण व महीला मंडळाचे सहकार्य लाभले.