Uncategorized

गणपती विसर्जन महामार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे – विजय अग्रवाल

Spread the love

 

अकोला / प्रतिनिधी
गणपती विसर्जन मार्गावरील रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे व गणपती विसर्जन शहरांमध्ये ठिकठिकाणी होत असताना त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था व साफसफाई याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे पत्र माझी महापौर भाजपा अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिले.
गणपती विसर्जन अकोला शहरामध्ये ठीक ठिकाणी उपस्थित आणि गणपती विसर्जन मार्ग तसेच त्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित करावे तसेच तिथे वीज पुरवठा करून विद्युत रोशनी करण्यात यावी अशा सूचना यांनी दिली.
गणपती उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात असताना याकडे महानगरपालिकेतील बांधकाम विभागाने व शीघ्र गतीने काम करावे जनतेची तक्रार येता कामा नये याकडे लक्ष द्यावे मनपा आयुक्त कविता द्विवेदी या विषयाकडे गांभी र लक्ष देतील असा विश्वास अगरवाल यांनी व्यक्त केला.
तसेच नवरात्रात सुद्धा नवरात्र धम्मचक्र दिवस ईद उत्सव तिन्ही समाजाच्या उत्सवाच्या दरम्यान मध्ये नागरिकांना गैरसोय होता कामा नये याकडे सुद्धा मनापासून विशेष लक्ष देऊन यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशीही मागणी अग्रवाल यांनी आयुक्ताकडे केली आहे. भक्त मंडळ तसेच दुर्गा मंडळ धम्मचक्र दिवस साजरा करणाऱ्या तसेच विविध सामाजिक संघटनेची संपर्क साधून प्रशासनाने अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशाही पत्र विजय अगरवाल यांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close