पार्डी येथे किरकोळ वादातून भाल्या ने मारून इसमाची हत्या, आरोपीची मोर्शी पोलिसात शरणागती
मोर्शी (संजय गारपवार )
तालुक्यातील पार्डी येथील पिंपळखुटा मोठा रोडवर पाण्याच्या टाकी जवळ किरकोळ वादातून लाकडीच्या काठीने मारहाण करून तसेच भाल्याने दहा ते बारा घाव मारून नामदेव भिवकुंडे नामक इसमाची निर्गुण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नामदेव भिवकुंडे यांचा मित्र फगु युवनाते यांनी घरी जेवणा करीता चिकन घेऊन आले होते. दोघांनी आरोपी फगु यांच्या घरी जेवणाआधी मद्य प्राशन केले होते. मृतक नामदेव यांनी मला घरी सोडून दे माझा दोस्त नाही अश्या गप्पा करीत असताना नामदेव व फगु यांच्या वाद झाला. या वादातून फगु युवनाते यांनी नामदेव भीवकुंडे याच्यावर भाल्याच्या साह्याने दहा ते बारा घाव घटनास्थळी ठार मारले. त्यानंतर आरोपी यांनी स्वतः मोर्शी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अटक करून घेतली. सदर घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना मिळतात मोर्शी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या नामदेव चा मृतदेहा चा घटनास्थळी पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
*अवैध दारू पायी गेल्या नामदेव चा जीव*
गावातील झोपडपट्टी भागात देवीदास भोयर नामक दारू विक्रेता गेल्या अनेक दिवसांपासून अवैध रित्या देशी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. अवैद्य दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत केली ठराव घेऊन ठरावाची प्रत राज्य उत्पादन शुल्क विभाग मोर्शी व पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. पोलिसांच्या वतीने ठोस पावले न उचलल्यामुळे गावात खुलेआम पणे दारू विक्री सुरू असल्याने या दारूच्या पायीचखून केल्या ची घटना घडली आहे.
त्याचप्रमाणे सहा महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत एका इसमाने हनुमान मूर्तीचे विटंबना केल्याची घटना सुद्धा घडली होती हे विशेष .