सामाजिक

जनतेच्या सुविधेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केल्या जाणार नाही – रणधीर सावरकर

Spread the love

अकोला / प्रतिनिधी

आपली जबाबदारी सोडून जनतेला त्रास देण्याचा काम होत असेल ते सहन केल्या जाणार नाही व भाजपा महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास योग्य दखल घेण्यात येईल असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी दिला.
वारंवार वृत्तपत्र लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्ष उड्डाणपूल खालील अंडर पास मध्ये पाणी पावसाळ्यात पाणी भरल्यानंतर परिस्थिती संदर्भात तक्रारी केल्यावर आंदोलन केल्यावर सुद्धा कुंभकर्णी अधिकारी नॅशनल हायवे तसेच प्रशासन लक्ष देत नाही याबाबत आमदार सावरकर यांनी अनेकदा भ्रमणध्वनीवर चर्चा केल्यावर सुद्धा अधिकारी काम काम झाले असे सांगतात परंतु आज त्यांनी पाणी काढण्यात आले असे सांगितल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी आमदार सावरकर यांनी जाऊन ऑनलाईन व्हिडिओ द्वारे पाणी असल्याची प्रत्यक्ष दाखवले आणि पूर्ण अंडरपास ची पाहणी करून अमरावती अकोला नागपूर आणि मुंबईचे अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स वर घेऊन संपूर्ण माहिती दिली आणि जर जनतेला त्रास होत असेल तर तो सहन केल्या जाणार नाही देशाचे दळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा यांनी जनतेच्या मागणीनुसार शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल ची मागणी केली त्याची पूर्तता नामदार गडकरी यांनी केली परंतु अधिकारी अशा प्रकारे काम करून सरकारला व विकासशील पुरुषांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो सहन केल्या जाणार नाही यासंदर्भात ताबडतोब पर्याय व्यवस्था व मोटर तसेच पाणी साचल्यानंतर काढण्याचे काढण्यासंदर्भात व पाण्याचं पाण्यासंदर्भात योग्य नियोजन करावे जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही. यासंदर्भात पुढे तक्रार आल्यास व जनतेला त्रास झाल्यास योग्य ती दखल घेण्यात येईल असाही इशारा आमदार सावरकर यांनी दिला यावेळी सावरकर यांच्यासोबत विजय अग्रवाल,अनुप धोत्रे तेजराव थोरात ,जयंत मसने, माधव मानकर डॉक्टर अमित कावरे सिद्धार्थ शर्मा अक्षय जोशी, अंबादास उमाळे अनिल गावंडे एडवोकेट देवाशिष काकड, संजय जीरापुरे राहुल देशमुख सागर शेगोकार संजय गोटफोडे, संजय गोडा, संतोष पांडे निलेश निनोरे विलास शेळके आधी समवेत होते.
भविष्यात असा प्रकार होणार नाही पाऊस आल्यानंतर योग्य तो नियोजन करून पाणी जमा होणार नाही व पाणी काढण्याची पर्यायी व्यवस्था सक्षम करण्यात येईल असे अभिवचन अधिकारी वर्गाने दिला व जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन या प्रकाराची दखल घेतली आहे ‌.
आमदार सावरकर अचानक पोहोचल्यामुळे व प्रत्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा संवाद साधल्यामुळे अधिकारी वर्गांच्या खोटेपणाचा प्रकार उघडकीस आला अनेक नागरिकांनी आमदार सावरकर यांच्या सक्रिय तिचे व प्रखरपणे अधिकाऱ्यांची संवाद साधून समज दिल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले जनतेच्या समस्येसाठी सदैव तत्परतेने कार्य करून जनतेलास त्रास होणार नाही याची दखल घेऊन सातत्याने काम करणारे व शासकीय योजनेचा लाभ व प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची किमया आमदार सावरकर करून खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवून. सर्वांना सोबत घेऊन कार्य करीत आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close