लोकशाही वार्ता वृत्तवाहिणीवर 72 तासांची बंदी
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या कथित सीडी प्रकरणात लोकशाही वृत्तवाहिणीवर कारवाई करण्यात आली असून या चॅनल च्या प्रक्षेपणावार 72 तासांची बंदी घातली असल्याची माहिती लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी इन्स्टाग्रामवर दिली आहे. प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.
इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सुतार म्हणाले, किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वाहिनी आज संध्याकाळी 7 वाजेपासून पुढील 72 तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश वाहिनीला संध्याकाळी 6.13 वाजता प्राप्त झाले. सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही, असही पोस्टमघ्ये म्हटलं आहे.
इन्स्टाग्रामवरील सुतार यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र त्यांच्या तोंडावर पांढरी पट्टी बांधण्यात आली आहे. लोकशाही चॅनलवर सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध कऱण्यात आला होता. सोमय्या महिलेशी फोनवर व्हिडीओ चॅट करत असल्याचे आरोपही त्यावेळी करण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच निर्णय देण्यात आला आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेणार आहोत. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती, असंही सुतार यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.