शिवाजी शाळेत विधिवत ‘श्री’ ची प्राणप्रतिष्ठा विद्यार्थ्यांनी जल्लोषात केले बाप्पाचे स्वागत
मोर्शी / संजय गारपवार
स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख यांच्या हस्ते ‘श्री’ ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी परंपरागत पोषाख परिधान करून बँड ताशाच्या गजरात व मोठ्या जल्लोषात बाप्पांची शहरातून मिरवणूक काढून शाळेत बाप्पाचे शाळेत स्वागत केले.
याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य प्रभाकर पाटील,नानासाहेब पाटील,एन.एस.गावंडे,डी.एच.अर्डक,मोर्शी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल डहाके,बाबुराव पडोळे,दत्तराज इंगळे,सुनिल जगताप,विष्णुपंत पाचाळे,जेष्ठ शिक्षक श्रीकांत देशमुख,शिक्षक प्रतिनिधी अजय हिवसे,शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी प्रदिप धोटे,उत्सव प्रमुख मिलिंद ढाकुलकर,संदीप ठाकरे,शीतल टोळे,नलिनी खवले,धनश्री कोंबे,प्रविना बोहरोपी यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.गणपती उत्सवांतर्गत शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.