रुद्रापूर ते कासराळी रस्त्याचे काम अर्धवट मुरमा ऐवजी लाल मातीचा वापर
बिलोली (प्रतिनिधि):
तालुक्यातील रुद्रापूर गाव कासराळी पासून तीन किलोमीटर अंतरावर असून २० मार्च रोजी रस्त्याचे खोदकाम करून मुरमा ऐवजी लाल मातीचा वापर करून फक्त दबाई करून ठेवल्यामुळे रस्त्यात पावसामुळे पूर्ण चिखल होऊन रस्ता खचून गेला आहे ,मोटरसायकल व अनेक दुचाकी पडत आहेत.
हे काम अर्ध्यात सोडल्यामुळे गावकऱ्यांना येणे जाणे करण्यासाठी चिखलातून कसरत करावी लागत आहे हे अर्धवट स्त्याच्या कामामुळे एसटी बस सुद्धा बंद झाले, शाळेला जाण्यासाठी ६० ते ७० विद्यार्थी चिखलातून रस्ता शोधण्याचे काम करत आहेत लहानासह मोठ्यांना जाण्याने खूप कठीण झाले आहे.
गावकरी व सरपंच यांनी गुत्तेदाऱ्याला विचारणा केली असता बजेट नसल्याचे कारण देत आहे असे निदर्शनास आले यात सरपंचाचे म्हणणे आहे की, रस्त्याचे बजेट पडून सुद्धा काम पूर्ण करत नसल्यामुळे जिल्हा परिषद व बांधकाम उपविभागाचे अधिकारी लक्ष देतील का याकडे गावकरी व सरपंचाचे लक्ष लागले आहे.
यावर प्रशासन योथोचीत कारवाई करावे आणि उर्वरित काम पूर्ण करावे ही समस्त गावकऱ्यांची अपेक्षा आहे.