आध्यात्मिक

भव्यदिव्य स्वरूपात होणार यवतमाळच्या राजाचे आगमन

Spread the love

 

भव्य शोभायात्रा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमाचे आयोजन

यवतमाळ 
अरविंद वानखडे

मागील ६० वर्षापासून यवतमाळ शहरातील सुप्रसिद्ध नवयुवक गणेश उत्सव मंडळ, मारवाडी चौक येथील ‘यवतमाल का राजा सेवा परिवार ” च्या वतीने यावर्षीसुद्धा गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दिनांक १९ सप्टेंबर रोजी यवतमाळ का राजा ची भव्य शोभायात्रा स्थापना मिरवणूक, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, सायकल वितरण, शिलाई मशीन वितरण, वस्त्रदान, आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला आत्मनिर्भर करून देण्यासाठी उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचा शुभारंभ तसेच नियमित पणे महाप्रसादाचे आयोजन या शिवाय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ‘यवतमाळ का राजा नवयुवक गणेश मंडळ” चे अध्यक्ष मनोज पसारी यांनी सांगितले.
दिनांक १९ सप्टेंबर रोजी “यवतमाल का राजा” ची स्थापना करण्याकरीता भव्य शोभायात्रा मारवाडी चौक येथून प्रारंभ होणार असून या शोभायात्रेमध्ये शिवराज ढोलपथक यवतमाळ, दिलीप बँज्यो पार्टी यवतमाळ, शौर्य पथक प्राचीन युद्ध काल, बाभुळगांव, उजैन्नचे भव्य राम रमैय्या पार्टी, जोधपूर येथील आदिवासी नृत्य एवं कॉमेडी टीम तसेच इंदोर येथील विशाल महाकाल शंकरजी व अघोरी टीम, इंदोर येथील महाबली हनुमानजी व वानसेना, दिल्ली येथील नवदुर्गा ग्रुप, जसलमेर राजस्थान येथील पारंपारिक वेशभुषा एवंम नृत्य `यवतमाल का राजा’ परिवारातील परंपरागत ध्वजा घेऊन ३० महिलांचा गट या व्यतिरिक्त अनेक आकर्षक दिखावे या शोभायात्रेत राहणार आहे. ही शोभायात्रा मूर्तीकार वनकर बंधु तलाव फेल येथून प्रारंभ होऊन गणेश चौक, नेहरू चौक, तहसील चौक, नेताजी चौक, जुन बसस्टेशन, दत्त चौक, जाजू चौक, आठवडी बाजार, शनिमंदिर चौक मार्गक्रमण करीत मारवाडी चौक येथे “यवतमाल के राजा” ची विधीवत स्थापना होईल.
दिनांक १९ ते २८ सप्टेंबर पर्यंत विविध रुग्णांच्या संपूर्ण तपासणीवर संजिवन मल्टीस्पेशालिट मध्ये रुग्णांना २० टक्के सवलत देण्यात येणार असून त्या संदर्भात रुग्णांकरीता कार्ड उपलब्ध करण्यात आले आहे. दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुंदर कांडचे पठन तर दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता अर्थवशिर्ष पठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर २० सप्टेंबर पासून २७ सप्टेंबर पर्यंत एक्युप्रेशर कॅम्प दररोज दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत अग्रेसन भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याकरीता डॉ. राजेंद्र सारन राजस्थान हे सेवा देणार आहे. तर २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दुपारी ४ ते ६ वाजेपर्यत मोफत फिजीओथेरपीचे आयोजन अग्रेसन भवन येथे करण्यात आले आहे. दिनांक २१सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिराकरीता दत्ता मेघे हॉस्पीटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर हे रूग्णांची तपासणी करणार असून या करीता १०० रूग्णांची शस्त्रक्रिया करीता निवड करून त्यांच्या आवास-निवास व भोजनाची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. २३ सप्टेंबर रोजी होमीयोपॅथी शिबिराचे आयोजन व मोफत औषधीचे वितरण गरजू रुग्णांना करण्यात येणार आहे. दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत यवतमाळ शहरातील मुळव्याध, भगंदर तपासणी शिबिराचे आयोजन गवार्ले पाईल्स हॉस्पीटलच्या वतीने डॉ. अंजली गवार्ले ह्या करणार असून गरजू, गरीब रुग्णांना पाईल्सचे औषध मोफत वितरीत करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे दुपारी ४ वाजता यवतमाल का राजा सेवा परिवाराच्या वतीने दुपारी ४ वाजता ७ गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण तर ७ विकलांग बांधवांना तीन चाकी सायकलचे वितरण ७ विधवा महिलांना शिलाई मशीनचे वितरण तसेच पूरग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त ७ कुटुंबांना उद्योग व्यवसायाची सुरूवात करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. दि.२५ सप्टेंबर रोजी अमरावती येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विधी उलशान ह्या रुग्णांची तपासणी करणार असून गरजू रुग्णांना औषधीचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच दि. २६सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हे रक्त यवतमाळ येथील शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्याल येथील रक्तपेढीला रक्तदान करण्यात येणार आहे. तसेच नियमितपणे सकाळी ११ ते २ व संध्याकाळी ७ ते ११ यावेळात महाप्रसादाचे सुद्धा आयोजन तसेच शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये नियमितपणे १०० टिफिनचे वितरण गणेश उत्सवादरम्यान यवतमाल का राजा सेवा परिवार व नवयुवक मंडळ मारवाडी चौक, यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे.दि.२७सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षन म्हणजे यवतमाल का राजा श्री चे मंडपाचे डेकोरेशन बंगाल येथील ४० कारागिरांच्या माध्यमातून अविरतपणे प्रयत्न करून साकार करण्यात येत आहे. तर या मंडपात जलजीवालय साकार करण्यात येत असून यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच जल जीवालय साकार करण्यात येत आहे “अॅक्युरिअम थिम” व नयनरम्य मंडप डेकोरेशन यवतमाळकरांचे लक्ष वेधत असून विधिवत पूजा, अर्चना, आरती मंडळाच्या वतीने होणार आहे या सर्व उपक्रमाचा यवतमाळकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन यवतमाल का राजा सेवा परिवाराने केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close