माणुसकीच्या आव्हानाला धावली माणुसकी उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला माणुसकीच्या भिंती कडून तातडीची मदत
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद – काही दिवसांपूर्वी दोन-तीन दिवस पाऊस झाला,त्या पावसामध्ये लिंबी येथील एका परिवारचे घर पाणी व वाऱ्यामुळे पडले. घरातील सर्व सामान व वस्तूचे नुकसान झाले.सुदैवाने जीवितहानी टळली,काही मदत भेटेल म्हणून त्या कुटुंबाने प्रयत्न केला पण कुठेच काही मदत भेटली नाही, घरातील सामान वस्तू भिजत होते,माणुसकीची भिंत सदस्याकडे त्या परिवाराने धाव घेतली.सर्व परिस्थिती सांगितली,माणुसकीची भिंत सदस्यांनी पाहणी करून त्यांना जमेल तशी मदत करू असे आश्वासन दिले. या मानवीय कार्यास मदत करायचे आव्हान माणुसकीची भिंत सदस्यांनी माणुसकीची भिंत व्हाट्सअप ग्रुप वर केले असता, जमा रकमेतून त्या परिवाराकरीता टिन,लाकडी बल्ल्या व कपड्याची व्यवस्था व सहा हजार रुपये नगदी घर उभे करण्याकरिता मदत केली. माणुसकीची भिंतच्या कार्याचे सर्व पुसद परिसरात कौतुक होत आहे, माणुसकीची भिंत सदस्यांनी या मानवीय कार्यास ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानले व दात्यांच्या हस्तेच हा कार्यक्रम पार पडला.मानवीय कार्यास मदत करणारे दाते शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे,सीमा जाधव,करणभाऊ ढेकळे जिजाई दूध केंद्र,प्रभाकर टेटस सुमित नर्सरी,रमेश डंबोळे,अमोल गंगात्रे,अमित हटवार,विनोद शिंदे,नितीन र.चव्हाण,सोनालीताई नाईक,गणेश गंगाराम शिंदे,दिलीप जाधव,त्रिमूर्ती हार्डवेअर गादेवारभाऊ,
सागर आदिनाथ भागवत,शेषराव चव्हाण (कारभारी) मुंबई कल्याण,रुपेश भाऊ चव्हाण मुंबई कल्याणगजानन सरकटे ओंकार ऑप्टिकल,बालाजी बंडेवार,नानाभाऊ जळगावकर,अरविंदभाऊ पवार,राजूसर काकडे,वसंत जाधव तलाठी,एम सी एल कंपनी,अरुण नागुळकर,मनोज दिलीप पोपट,साक्षी क्षीरसागर,संदिप मैराळ पाटील,गीताई केंद्र शैलाताई सावंत,श्रीमती मंजुषाताई डेकाटे मॅडम,वरद दीपक मुंदडा,उमेश रमेश देवतळे (यवतमाळ)सुरज भाऊ शिंदे,शिवदास सुर्यपाटिल वरुड,अविनाश भोजु राठोड माणिकडोह पुसद,संदीप भाऊरावजी मानकर, तलाठी,अनिता रामचंद्रा हिरवे,मिल्क प्युअर डेअरी,श्री उमेश गजानन गावंडे कनिष्ठ अभियंता महावितरण पुसद,श्री महेश संजय जाधव,श्री सचिन श्रीराम भरणे,अनिरुद्ध रतन मडावी,गुप्तदान एडवोकेट साहेब,दीपक श्रीराम सिरमवार आरिफ इमरान खान सुभाष आनंदराव कदम व माणुसकीची भिंत शुभचिंतक व सर्व सदस्य उपस्थित होते.