घाटंजी तहसील कार्यालय माहिती देण्यास करते दिरंगाई
भूदान ज्ञन मंडळ ची माहिती देण्यास टाळाटाळ तहसील च्या पारदर्शक कामावर ॽ.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तहसील कार्यलयात अनेक तक्रारी धूळखात असून तहसिल कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याने व तहसिल विभाग वरिष्ठ अधिकारी यांचा वचक कर्मचारी वर्गास नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करतात. कामात शिस्त व पारदर्शकता यावी यासाठी झिरो पेंडेन्सी करिता विविध कायदे बनविण्यात आले,दप्तर दिरंगाई कायदा,सेवा हमी कायदा, अभिलेखे व्यवस्थापन कायद्यान्वये एखाद्या प्रतारीत व्यग्तीने कोणतीही माहिती मागितली तर ती सात दिवसापेक्षा जास्त वेळ प्रलंबित राहू नये असे स्पष्ट निर्देश असताना त्याची कोणतीच अंमलबजावणी होत नसल्याने दिसत असून हे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे. तहसील कार्यलयात पारदर्शक काम नसल्यामुळे माहिती अधिकारात भूदान ज्ञन मंडळ अंतर्गत भू वाटप ज्या लोकांना जमीन देण्यात आल्या अश्यांची माहिती देण्यासाठी टाळाटाळ होते असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी केला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते यांना एक महिन्यानंतर माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी अपिल करून सुद्धा माहिती मिळत नसल्याने हे जाणीवपूर्वक केले जात असून भूदान यज्ञ मंडळ अंतर्गत अनेक गैरप्रकार व नियमबाह्य जमीन वाटप व त्यात केले फेरफार यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे भ्रष्टाचाराचे बिंग फूटून
उघडकीस येण्याच्या भीतीने ही माहिती देण्यास टाळाटाळ होत तर नाही ना ॽ अशा प्रश्न निर्माण होतो.या गंभीर विषयावर घाटंजी तहसीलदार साहेब तहसील मधील कामातील पारदर्शकतेवर नियंत्रण आणतील का?ही चर्चा जनसामान्य माणसात होत आहे. घाटंजी तहसील कार्यलयात अप्पर तहसीलदार,तहसीलदार निवासी तहसीलदार,नायब तहसीलदार,अवल कारकून अशी मुख्य पदे असताना जनतेची कामे वेळेत न होणे या सारखे दुर्दव्य काय म्हणावे! तेव्हा मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी घाटंजी तहसील ला भेट देऊन संबंधित अधिकारी यावर कार्यवाही करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व जनतेतून होत आहे.