क्राइम

पाकिस्तान मधील डॉक्टरांकडून हिंदू तरुणीवर सामूहिक बलात्कार 

Spread the love

सिंध ( पाकिस्तान )/ नवप्रहार मीडिया 

                    पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समाजावर अन्याय ही काही नवीन बाब नाही. पण एका तरुणीसोबत पाकिस्तान च्या सिंध प्रांतात जे घडलं ते फार निषेधार्थ आहे. येथे किडनीच्या उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या नंतर तरुणीची तब्येत खलावल्याने तिला हैदराबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक आहे. बलात्कार केल्या नंतर तिन्ही डॉक्टर फरार झाले आहेत.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिंध प्रांताच्या टंडो मुहम्मद खान शहरातील इंडस हॉस्पिटलमध्ये घडली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टरने तिला गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर त्या फिर्यादीची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली आहे.

आरोपी डॉक्टर आणि त्याचे सहाय्यक फरार असल्याचे तपासातून समोर आले आहे. अल्पसंख्याक हिंदू समाजातील मुली व सूना रुग्णालयातही सुरक्षित नाहीत असे म्हणत पीडितेच्या कुटुंबियांनी निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी केली आहे.

सोशल मीडियावर चर्चा…

सामूहिक बलात्कारानंतर पीडितेच्या वक्तव्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तान डिफेन्स नावाच्या वेबसाईटनं आपल्या रिपोर्टसोबत फराज परवेझची एक्स पोस्ट शेअर केली आहे. पाकिस्तानमधील हिंदू अल्पसंख्याकांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या फराजने आपल्या एक्स-पोस्टमध्ये पीडितेच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती स्थानिक भाषेत या भीषण घटनेची माहिती देत ​​आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close