हटके

पाळीव प्राण्यांवर नैसर्गिक अत्याचार ; फोटो काढणाऱ्यांना हातपाय तोडण्याची धमकी 

Spread the love

पोलिसात गुन्हा दाखल

केज / नवप्रहार मिडिया

               केज तालुक्यातून एक मानवतेला काळिमा फासणारी घटना उघड झाली आहे.तालुक्यातील विडा गावापासून जवळच असलेल्या कोरडेवाडी येथे एका व्यक्तीने आपल्या पाळीव प्राण्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

               उपलब्ध माहिती नुसार कोरडेवाडी  येथील एक शेतकरी व त्याचा मित्र हे शेतात काम करण्यासाठी जात असताना त्यांना गायरानात झाडी मधुन एका पाळीव प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी कानोसा घेऊन त्या ठिकाणी जावुन पाहीले असता त्यांना धक्का बसला. त्या निर्मनुष्य ठिकाणी त्यांच्या ओळखीचा एक इसम हा नग्न अवस्थेत होता. त्याने त्याच्या मालकीच्या एका पाळीव प्राण्यांचे चारही पाय दोरीने बांधलेले आढळून आले. तो त्या पाळीव प्राण्या सोबत अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही घटना पाहिलेल्या दोघांनी गुपचूप या घटनेचे मोबाईलमध्ये फोटो काढले.

त्यानंतर त्यांनी त्या नराधमस या घटनेचा जाब विचारला. तेव्हा त्या नराधमाने बघणाऱ्यानी ही घटना कोणाला सांगितली; तर पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने धमकी दिल्यामुळे घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या दोघांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्या नंतर दोन दिवसांनी म्हणजे आज सकाळी त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. आज (दि. २ सप्टेंबर) पाळीव प्राण्यांसोबत अनैसर्गिक संभोग करणाऱ्या नराधमा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घृणास्पद अत्यंत चीड आणणाऱ्या आणि प्राण्यावर अनैसर्गिक बलात्काराच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close