माजलगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
नगर / प्रतिनिधी माजलगाव जिल्हा बीड येथील सोनार समाजाच्या पाच वर्षाच्या अल्पवयीन बालकेवर शिक्षकाने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात अहमदनगर लाड सुवर्णकार समाजाचे वतीने अहमदनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निषेधत्मक निवेदन देऊन आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. याप्रसंगी लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय देवळालीकर ,विश्वस्त शाम मुडलिक, मुकुंद निफाडकर ,सुरेश मैड,विनोद लिंबीकर (कुलथे) ,गणेश मुंडलिक ,रेवन लोळगे ,महेंद्र नांदुरकर कुणाल शाह, सुनील देवळालीकर उपस्थित होते.
समाजामध्ये अशा मनोविकृत प्रवृत्ती वाढत असून शिक्षकासारख्या समाज घडवणार्या घटकांनी असे कृत्य केले तर सामाजिक स्वास्थ धोक्यात येईल. अशा समाजविघातक अपप्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संजय देवळालीकर यांनी व्यक्त केली. हे निवेदन मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, गृहमंत्री यांनाही देण्यात येणार असल्याचे समाजाचे वतीने सांगण्यात आले.
माजलगाव जिल्हा बीड येथील सोनार समाजाच्या पाच वर्षाच्या अल्पवयीन बालकेवर शिक्षकाने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात अहमदनगर लाड सुवर्णकार समाजाचे वतीने अहमदनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निषेधत्मक निवेदन देऊन आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. याप्रसंगी लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय देवळालीकर ,विश्वस्त शाम मुडलिक, मुकुंद निफाडकर ,सुरेश मैड, विनोद लिंबीकर (कुलथे) ,गणेश मुंडलिक ,रेवन लोळगे ,महेंद्र नांदुरकर कुणाल शाह, सुनील देवळालीकर आदी.