घाटंजी गुरुदेव सेवा महिला मंडळानी केले सर्व जाती- धर्मिय नारळी पौर्णिमा साजरी
माजी सैनिक,पोलीस आणी पत्रकार बांधवांनी राखी बांधून घेत दीले रक्षणाचे वचन
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजीत श्री गुरुदेव सेवा महिला मंडळाच्या वतीने पोलीस स्टेशन घाटंजी येथील प्रांगणात देशाची व समाजातील लोकांची सुरक्षितता ठेवणारे भारतीय सैनिक व पोलिस आणी समाजातील घडणा-या चांगल्या वाईट घटनांना जनता जनार्दन पर्यंत लेखणीतून उजाळा देणारे पत्रकार यांना सामूहीक रक्षाबंधन निमित्ताने राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर होते तर,प्रमुख पाहुणे ज्युनियर कमिशनर तुळसिदासजी आत्राम, मुकेशभाई गंढेचा,नागेश खाडे, विलास सिडाम,सुशिलकुमार शर्मा हे होते.या नारळी पौर्णिमा कार्यक्रमातुन राखी बांधून ओवाळून समाजातील महीला वर्गा प्रती जो अनादर आणि अत्याचाराच्या घटना समाजातील वाईट वृत्तीच्या लोकामुळे घडत आहे,त्यावर आळा बसवून नियंत्रण ठेवण्याचे मोलाचे काम पोलीस बांधव करित आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ठाणेदार निलेश सुरडकर यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन करतांना महीला बहीणींनी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून पोलिस प्रशासनावर जो विस्वास दाखविला त्याबदल् आभार व्यक्त केले सोबतच संपुर्ण पोलिस कर्मचारी हे सदेव महीला रक्षणासाठी सज्ज राहील ही ग्वाही दीली. या कार्यक्रमात पत्रकार कज्जुम कुरेशी यांनाही महीला बहीणींनी राखी बांधत हींदू मुस्लिम एकता आबादीत रहावी हा मौलिक संदेश दीला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गुरूदेव सेवा मंडळाचे अनंतराव कटकोजवार यांनी केले तर,आभार सुभाष देवळे यांनी मानले.कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर वातिले,संघपाल कांबळे,संदीप माटे,प्रशांत उगले,मणोज राठोड,पत्रकार अरविंद चौधरी,बंडू तोडसाम,जितेंद्र जुनगरे,सुधाकर अक्कलवार,संतोष अक्केवार,सचिन कर्णेवार,वसीम भाई,पुंडलिक सोनटक्के,शिवम देवळे,हनुमान कुमरे व इतरही समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन गुरूदेव सेवा महिला मंडळातील मंगला कटकोजवार,विद्या देवळे,सविता मानकर,ललिता ताटेवार,मेघाली जुनगरे,मंगला सोयाम,ताई राठोड,अर्चना डफळे यांनी परिश्रम घेऊन केले.