डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची हेळसांड
दि-28/08/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे गर्भवती महिला यांना सरकारी दावाखाणा तर्फे सोनोग्राफीसाठी बोलावण्यात आले परंतु दवाखान्यातील हलगर्जीपणा करत असलेल्या डॉक्टरांमुळे सकाळ पासुन आलेल्या महिलांचे सोनोग्राफी झाली नाही. . सोनोग्राफी करणारा डॉक्टर सायंकाळी 4 वाजता आले अर्ध्या तास सोनोग्राफी करून परत गेले सायंकाळचे 7 वाजले तरी सुद्धा आले नाही. मागील काही दिवसा पासुन काही महिला सनोग्राफीसाठी दवाखान्यात दररोज येत आहे व काम न होता परत जावे लागत आहे… या डॉक्टर मॅडम चा स्वतःचा क्लिनिक सुद्धा धारणी येथे आहे यावरून डॉक्टर स्वतःचा क्लिनिक मध्ये जास्त लक्ष्य /वेळ देहून शासकीय दावाखण्याकडे कामचुकारपणा करत असल्याचे स्पष्ट होते अश्या हलगर्जीपणा करत असलेल्या डॉक्टरांवर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी असे मेळघाटातील आमदार तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची विनंती महिवणच्या कुटुंबियांकडून कर यात आली आहे.