विशेष

भीषण अपघात रॉल्स रॉयस कार चा चक्काचूर ; दोन लोकांचा मृत्यू 

Spread the love

 भीषण अपघात रॉल्स रॉयस कार चा चक्काचूर ; दोन लोकांचा मृत्यू

हरयाणा / नवप्रहार मीडिया

                      रॉल्स रॉयस ही महागडी गाडी (कार ) असून ती खूप सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते. याच कार ने झालेल्या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. ही कार प्रसिद्ध उद्योगपती विकास मालू यांच्या मालकीची असून ते या अपघातात बचावले आहेत. पण त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.त्यांच्यासोबत असलेल्या चार लोकांपैकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 हरयाणाच्या नूह येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. विकास मालू हे रॉल्स रॉयस या 10 कोटीच्या कारमधून चालले होते. 200च्या स्पीडने त्यांची कार चालली होती. या कारने टँकरला जोरदार धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाला आहे. विकास मालू हे अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे मित्र आहेत. कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात त्यांचं नाव आलं होतं.

कारमधून विकास मालू यांच्यासहीत चार लोक चालले होते. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मालू यांच्यासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मालू यांच्या पार्श्व भागाला  गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात येत असून सोमवारी त्यांचं ऑपरेशन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मालू हे कुबेर ग्रुपचे मालक आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close