अंजनगाव सुर्जी येथे पाण्यासाठी नागरिकांची नगर पालिकेत धडक
दहा वर्षापासून पिताहेत बोअर चे पाणी
कंत्राटदारांची मनमानी
नगरोत्थान योजनेच्या कामाबाबत जनतेत रोष
अंजनगावसुर्जी ( मनोहर मुरकुटे )
अंजनगाव सुर्जी शहरातील प्लॉट भागातील अंबिका नगर ,गंगोत्री नगर, पुर्वा नगर,यश नगर हा भाग गेल्या दहा वर्षापासून म.जी.प्रा च्या शुद्ध पाण्यापासून वंचित असून पाच वर्षापूर्वी नगर पालिकेच्या नगरोत्थान योजनेतून शहराच्या वाढीव भागात जलवाहिनी टाकून या भागाला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असताना गेल्या चार वर्षापासून काम केल्या जात नसल्याने सदर भागातील नागरिकांनी बुधवारी नगर पालिकेत धडक दिली व जो पर्यंत आमच्या भागात जाणारी पाईप लाईन टाकल्या जात नाही तो पर्यंत आम्ही येथून उठणार नाही ही भूमिका घेतली परंतु नंतर मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी संबंधित कंत्राटदाराला बोलून चार दिवसात काम केल्या जाईल असे आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी नमती घेत आंदोलन मागे घेतले
******* २०१८ मध्ये शहरातील निर्माण होणारी कृत्रिम पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत शासनाच्या नगर विकास विभागामार्फत साडेसहा कोटी रुपयाची नगरोत्थान योजना मंजूर करण्यात आली परंतु कंत्राटदाराचा बेजबाबदारपणामूळे या योजनेचा बोजवारा उडाला पंधरा महिन्याच्या कामाला तब्बल साडेतीन वर्ष होत असताना केवळ दोन टाक्या बाधण्या पलीकडे कुठलेही काम पूर्ण झाले नाही शहरातील आवश्यकता असलेल्या वाढीव हद्दीतील भागात जल वाहिन्या टाकल्या गेल्या नाहीत त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना बोअर चे पाणी प्यावे लागत असलेल्या अंबिका नगर,गंगोत्री नगर, पुर्वा नगर,यश नगर येथील या भागातील नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून नगर धडक देऊन पाईप लाईन टाकण्याची मागणी करत आहेत परंतु कंत्राटदाराच्या मनमानी पणामुळे काम रेंगाळत राहत आहे गेल्या दीड महिन्यापासून या भागात टाकण्यासाठी पाईप आणल्या गेले परंतु ते भूमिगत करण्याचे काम केल्या जात नाही ह्याबाबत ह्या भागातील नागरीकानी नगर पालिकेत बाजू मांडली होती, शिवाय आज बुधवारी (ता.१४) सबंधित कंत्राटदार या भागातील पाईप इतरत्र नेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत एल्गार पुकारत एकत्रित सर्वांनी नगर पालिकेत धडक दिली व मुख्यधिकाऱ्यांच्या कक्षात ठान मांडले मुख्याधिकारी नसल्याने ते तास दोन तास बसून राहिले नंतर मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे आल्यानंतर त्यांनी सबंधित कंत्राटदाराला बोलून येत्या चार दिवसात या भागात पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी नमती घेतली व आंदोलन मागे घेतले यावेळी स्थानिक अंबिका नगर ,गंगोत्री नगर, पुर्वा नगर,यश नगर येथील रहिवाशी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या