सुनेची अब्रू वाचविण्यासाठी सासू बनली रणचण्डिका

सुनेची अब्रू वाचविण्यासाठी सासू बनली रणचण्डिका
बदायु (युपी)/ नवप्रहार मीडिया
सासू आणि सुनेत कितीही प्रेम असले तरी सासू आईची आणि सून मुलीची जागा घेऊ शकत नाही असे नेहमीच म्हटले जाते. पण बदायु येथील एका सासूने सुनेची अब्रू वाचविण्यासाठी स्वतःचा नवऱ्याला यमसदनी झाडले असल्याची घटना घडली आहे. अशी घटना क्वचितच घडत असल्याचे बोलल्या जात आहे.
उत्तर प्रदेशातील बदायूं येथे 14 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. तेजेंद्र सागर (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे समोप आले आहे. खरंतर तेजेंद्रची त्याच्या मुलाच्या बायकोवर, म्हणजेच त्याच्या सुनेवर वाईट नजर होती. हे तेजेंद्रच्या पत्नीच्या लक्षात आले होते. या वरून त्यांच्यात कितीतरी वेळा वादही झाले होते, पण तेजेंद्र काही सुधारला नाही. म्हणूनच त्याच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत सुनेच्या इज्जतीसाठी स्वत:च्याच हाताने स्वत:चं कुंकू पुसलं.
पत्नीनेच केली पतीची हत्या
मिथिलेश असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार तिच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. पण गेल्या वर्षभरापासून तिचा नवरा, तेजेंद्र याची सुनेवर वाईट नजर होती. त्यावरून त्या दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाले, मात्र तो काही सुधारला नाही. अखेर 14 ऑगस्टच्या रात्री ३ च्या सुमारासा ती भयानक घटना घडली.
बिलसी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला क्रमांक 8 मध्ये राहणारा तेजेंद्र हा वाढत्या उकाड्यामुळे घराबाहेर झोपला होता. रात्री तेजेंद्रचा कोणीतरी कुऱ्हाडीने शिरच्छेद केला. झोपेत असतानाच त्याची खून झाल्याची माहिती गावात पसरताच एकच हल्लाकोळ माजला. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्वरित तपास केला, त्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली.
14 ऑगस्ट च्या रात्री नेमकं काय घडलं ?
खरंतर पोलीस तपासात मृत तेजेंद्रची पत्नी मिथिलेशचे नाव पुढे आले. तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. पती तेजेंद्र तिला रोज मारहाण करायचा आणि सुनेवर त्याची वाईट नजर होती. यामुळे वैतागलेल्या पत्नीने रात्री प्रथम कुऱ्हाडीला धार दिली आणि पहाटे तीन वाजेच्या सुमारास तेजेंद्र गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीचे अनेक वार करून त्याची हत्या केली. आरोपी महिलेने गुन्हा कबूल केला असून तिला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.