क्राइम

रक्ताने माखलेला चाकू घेऊन तो अल्पवयीन जेव्हा ठाण्यात पोहचला तेव्हा पोलिसांना बसला धक्का

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

                      एखाद्या क्षेत्रात दादागिरी करत असलेल्या इसमाला कोणाशीही पांगा घेण्याची सवय होऊन बसते. पण हाचा पंगा आपल्याला भारी पडेल याची त्याला कल्पना नसते. अमित सोबतही असेच घडले. अमित ने ज्याला लहान बालक समजून त्रास दिला त्यानेच अमित चा जीव घेतल्याचा प्रकार राजधानीतील नबी करीम  ठाण्यात घडला आहे.

नबी करीम पोलीस ठाण्याजवळ गस्त घालणाऱ्या पोलिसांना रात्री दीड वाजता मुल्तानी ढांडा गल्लीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह आढळला होता. तपासानंतर मृतदेहाची ओळख पटली. अमित नावाची ही व्यक्ती उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे वास्तव्यास होती. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते.अमित ची हत्या कोणी केली असावी ? यावर पोलीस विचार करत असतानाच ऐक अल्पवयीन मुलगा हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोहचला.

त्याने खून केल्याचे पोलिसांना सांगितले – अल्पवयीन मुलाला हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन पाहिल्यावर पोलिसांच्या सुरवातीला काही. लक्षात आले नाही. त्यांनी त्याला बसवून शांततेने काय झाले याची विचारणा केल्यावर  त्याने इसमाचा मर्डर केल्याचे सांगितले.

या कारणाने केला खून – अमित या क्षेत्रातील दादा माणूस होता. तो परिसरातून हफ्ता वसुली करीत होता. त्याने काही दिवसांपूर्वी अमित ची हत्येच्या आरोपातून तुरुंगातून सुटका झाली होती. दोन दिवसांपूर्वी त्याने अल्पवयीन मुलाच्या हातातून पैशे हिसकावून त्याचा अपमान केला होता. याने हा अल्पवयीन मुलगा संतापला होता. त्यामुळे मौका मिळताच त्याने अमित च खून केला.

चाकू आणि कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी –

पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून रक्ताने माखलेले कपडे आणि चाकू जप्त करुन फॉरेन्सिकसाठी पाठवले आहेत. तपासात हेदेखील समोर आलं आहे की, या हत्येमध्ये आकाश उर्फ काकू नावाचा आणखी एक तरुण सहभागी होता, जो घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अमितची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. हत्येच्या दिवशी आरोपीने अमित दिसताच त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close