नागपंचमी निमित्ताने घाटंजीत सर्प जनजागृती.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजीतील सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध असलेले जितू सहारे यांच्या वतीने घाटंजीतील पोस्ट ऑफिस जवळ नागपंचमी निमित्ताने सर्प जनजागृती करण्यात आली.मानवी जीवनात सापाचे स्थान महत्वाचे असून साप हा शेतकरी मित्र असून आपल्या परिसरातील सापाच्या जाती विषारी, बिनविषारी,निमविषारी सापा बाबत माहिती आणि साप चावला तर घ्यावयाची प्राथमिक काळजी याबाबत माहिती दिली. सर्प न मारता आपल्या भागात कूठेही साप निघाला तर, सर्पमित्र यांना बोलावून पकडू सापास जीवनदान दिले जावे सोबतचं साप प्रजाती नष्ट होण्यात आळा घालण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे असेही ते म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष बालू खांडरे,पेंटर किशोर ठाकरे,यांनी जितू सहारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सदर कार्यक्रम प्रसंगी संदिप माटे,अरून गोहाडे,दिपक भोंग,अमोल ठाकरे,धांदे, प्रमोद गिरी, गोलू फूसे सह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.