मोर्शी बाजार समितीस पणन मंडळाचे कार्यकारी संचालकांची भेट
मोर्शी(तालुका प्रतिनिधी)
मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम तसेच विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक अजय कडू यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बाजार समितीचे सभापती सचिन ठोके यांनी संजय कदम यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. समितीचे संचालक अरुण कोहळे यांनी उपसरव्यवस्थापक अजय कडू याचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. याप्रसंगी समितीचे सभापती सचिन ठोके, उपसभापती संजय तट्टे, संचालक संदिप रोडे, अरुण कोहळे, प्रकाश विघे, अ.रहिम कुरेशी, नरेंद्र जिचकार, प्रविण काळमेंघ, विजय इसळ, मोर्शीचे सहाय्य्क निबंधक राजेश भुयार, समितीचे सचिव लाभेश लिखीतकर तसेच संत्रा उत्पादक प्रगतीशिल शेतकरी निलेश रोडे हे हजर होते. यावेळी बाजार समिती सक्षमीकरण, कामकाज तसेच संत्रा प्रकल्पाविषयी चर्चा करण्यांत आली. यार्डची पाहणी केली. बाजार समितीचे संचालकासोबत उत्पन्न वाढीसंबंधी विचार विनियम केला. बाजार समितीचे आवारांत पणन मंडळाचे कार्यकारी संचालक यांचे हस्ते वृक्षारोपणन कार्यक्रम पार पडला. आज बाजार समितीचे सभापतीचा वाढदिवस असलेमूळे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या हस्ते सभापती सचिन ठोके यांचा सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमास कृषि पणन मंडळाचे दिनेश डागा, सरोदे, संत्रा उत्पादक शेतकरी बाजार समितीचे लेखापाल रितेश कुऱ्हाडे, अंबादास मसतकर, राजेंद्र तायवाडे, प्रमोद देशमुख, सुदर्शन रोडे व हंगामी कर्मचारी हजर होते.