प्री वेडिंग शूट तिच्या जीवावर बेतले असते : वेळीच मदत मिळाल्याने टळला अनर्थ
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क
सध्या प्री वेडिंग फोटो आहुती चे जबरदस्त क्रेझ आहे. आपले लग्न इतरांपेक्षा वेगळे असावे असा पत्त्येक जोडप्याचे विचार असतात. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार होतात. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा प्रीवेडिंग फोटो शूट चा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात तरुणीची फजिती झाली. हे वेडिंग शूट तिच्या जीवावर बेतले असते.
लग्नाळू मुलं- मुली प्रत्येक कार्यकम खास व्हावा यासाठी खूप मेहनत घेतात. एका तरुणीला आपलं प्री-वेडिंग फोटोशूट हटके अंदाजात करायचं होतं. यासाठी तिनं खूप मेहनत आणि तयारीही केली. मात्र ऐनवेळी तिच्यासोबत नको ते घडलं. प्री-वेडिंग फोटोशूट करणं तिला महागात पडलं. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.तुम्ही पण किचनमध्ये मोबाईल फोन घेता का? होऊ शकतो सिलेंडरचा स्फोट, पाहा Videoसमोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्री-वेडिंग शूटदरम्यान एका जोडप्यासोबत भीषण अपघात घडतो.
एक जोडपं प्री-वेडिंग शूटसाठी नदीत उतरताना दिसत आहे. पहिला मुलगा पाण्यात जातो. यानंतर, गाऊन परिधान करून मुलगी पाण्यात उडी मारते. मात्र तरुणीनं ठरवलं त्यापेक्षा भलतंच घडतं.मुलीने पाण्यात उडी मारताच ती थेट नदीत खाली खाली जाऊ लागते.
तिचा गाऊन पाण्यावर तरंगत राहतो. त्या मुलाने तिला पकडण्याचाही प्रयत्न केला, मात्र गाऊनमुळे तिला पकडणं कठिण होतं. तरुणीला वाचवण्यासाठी बाकीचे लोकही पाण्यात उड्या घेतात आणि तिला वाचवण्यासाठी मदत करतात. pic.twitter.com/38FM0gmq2v- Wild content (@NoCapFights) August 20, 2023मुलगी आणि मुलगा दोघेही रोमँटिक फोटोशूटसाठी नदीच्या पाण्यात उतरले. मात्र, पुढे ठरल्याप्रमाणे घडलं नाही.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता कशी कपलची फजिती झाली. Wild content नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 43 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.,