हटके

युवकाचा कोब्रा सोबत खतरनाक स्टंट ; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

Spread the love

             सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतात तर काही त्यांना आवडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर युवक आणि इंडियन कोब्राचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला काही मिनिटातच असंख्य व्हीव्ज मिळाले आहेत.

         भारतात किंग कोब्रा हा सगळ्यात जास्त विषारी साप आहे. याने मनुष्याला किंवा प्राण्यांना चावा घेतला तर काही सेकंदातच त्याचा मृत्यू होऊ शकतो. वेळेवर उपचार मिळाल्यास जीव वाचवल्या जाऊ शकतो. पण सापाच्या विषाचा असर संबंधितांच्या शरीरात किती प्रमाणात झाला आहे यावर सगळे अवलंबून असते.

पण काही माणसं या कोब्रा सापाशी खेळ करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक तरुण कोब्राच्या जवळ जाऊन त्याच्याशी मस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण काही सेकंदात नाग पिसाळतो अन् फणा मारतो. त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

खतरनाक कोब्राच्या या व्हिडीओनं इंटरनेटवर अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंडियन कोब्राच्या जवळ जाऊन एक तरुण त्याला स्पर्श करण्याची हिंम्मत करतो. पण काही सेकंदातच कोब्रा फणा काढून त्याला चावा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. @therealtarzann नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर इंडियन कोब्राचा हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे

इंडियन कोब्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, कोब्रा क्लास सुरु आहे. मलाही काही टीप्स द्या. दुसऱ्या एकाने म्हटलं, वाचला तू, नशीब त्याने तुला चावा घेतला नाही. अन्य एक यूजर म्हणाला, मृत्यूला आमंत्रण देण्याचा सोपा मार्ग. कोब्रासोबत खेळू नका..सापाशी खेळू नका..अशीही प्रतिक्रिया एका यूजरने दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close