एकलव्य इन्फोरमॅटिक्स संगणक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यदिना निमित्त
प्रश्नमंजुषा ज्ञान स्पर्धेच्या प्रमाणपत्र व बक्षिसाचे वितरण
राजेश सोनुने तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद:येथील एकलव्य इन्फोरमॅटिक्स संगणक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ७७ वा स्वातंत्र्यदिना निमित्त दि १४ ऑगस्ट२०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेत प्राविण्य गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बक्षिसाचे वितरण करण्यातआले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकलव्य इन्फोरमॅटिक्स चे संचालक गुरु शंकरराव माहुरे सर ,प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्रा.किशोर पाटील सर ,विशेष उपस्थितीत होते गजानन जाधव सर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा.किशोर पाटील सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संगणक युगाचे महत्व पटवून मोलाचे मार्गदर्शन केले.
आजचा काळ विज्ञान-तंत्रज्ञानाचा आणि संगणकाचे युग आहे, आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने अनेक शोध लावले आणि प्रगतिपथावर येऊन पोहोचले संगणकाचा शोध. सन १८३७ साली चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्या यांत्रिक संगणकाचा शोध लावला. कालानुरूप त्याच्यात अनेक सुधारणा होत गेल्या आणि आजच्या युगात जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे.
संगणक या यंत्राने आपली अनेक कामे अतिशय सोपी केली आहेत. बँकेचे व्यवहार, शासकीय कामे, अभियांत्रिकी-वैद्यकीय क्षेत्र, शाळा, महाविद्यालये अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत संगणक प्रणालीचा वापर आवश्यक झाला आहे. पैशांचे व्यवहार आणि हिशोबाची कामे संगणकामुळे सोपी झाली आहेत. इंटरनेटच्या शोधामुळे तर आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही विषयाची माहिती तत्काळ आपल्याला संगणकाच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे या संगणकाच्या माध्यमातुन मानवाला ज्ञानाची दालने खुली झाली आहेत. ई-मेल, सोशल मीडिया यांसारख्या गोष्टींचा वापर करून एकमेकांबरोबर माहितीची देवाणघेवाण करणे आणि संपर्क साधणे दोन्ही सहज शक्य झाले आहे. संगणक ही आजच्या युगाची क्रांती आहे.असे कोणतेही काम तत्काळ आणि अचूक करता येत असल्यामुळे मानवी जीवनामध्ये संगणक काळाची गरज बनला आहे. क्षेत्रात संगणकाचा वापर सर्रासपणे सुरू असल्याने संगणक काळाची गरज आहे. अशी माहिती संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली. यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसाचे वितरण करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल माहुरे सर यांनी केले.यावेळी संस्थेचे कर्मचारी कु.पोर्णिमा माहुरे ,कु.साक्षी भगत ,कु.निकीता जांबुतकर , ऋषिकेश राठोड,गणेश लेकुरवाळे ,राम जाधव तसेच संस्थेचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.