कलावती म्हणते मला सगळं राजीव गांधी मुळेच मिळालं
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
यवतमाळ जिल्ह्यातील जळका या गावची गरीब शेतकरी कलावती बांधूरकर यांच्या घरी काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राजीव गांधी यांनी अचानक कलावती बाई यांच्या घरी भेट दिली त्यानंतर कलावती बाईचे भाग्यच उजळले. कलावती या विधवा महिलेला त्यानंतर सामाजिक संघटनेमार्फत व शासनामार्फत अनेक मदतीचा वर्षाव झाला.
परंतु अलीकडे कलावती बाईच्या नावावर फक्त राजकारण केला जात असल्याचे नुकत्याच लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चे दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शहा कलावती बाईंना वीज घर, शौचालय, धान्य सर्व मोदी ने दिल्याचे शहा यांनी मत व्यक्त केले. त्यावर कलावती बाई यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले की, मला जे मिळालं ते सर्व राजीव गांधी यांच्यामुळे मिळालं विनाकारण माझ्या नावाचं राजकारण करून, स्वतःची पोळ भाजण्याचं काम भाजप करत असल्याचे कलावतीने मत व्यक्त केले त्यामुळे कलावती बाईंचं सगळीकडे कौतुक होत असल्याचे निर्देशनात येते.