आरोग्य व सौंदर्य

त्याच्या ओरडण्याकडे आई आणि डॉक्टरांनी केले दुर्लक्ष झाले असे 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                    प्रत्येक वेळी मुलं नाटक करतात असे नाही. काही वेळा त्यांचे रडणे कुठल्या दुखण्याला घेऊन असू शकते. पण आपणाला वाटते की तो नाटक करत आहे. एका आईला मुलाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात  पडले।आहे. मुलाच्या रडण्याला  डॉक्टरांनी देखील हलक्यात घेतले. त्यांना वाटले तो नाटक करतो आहे. पण घरी गेल्यावर तो जेव्हा जमिनीवर कोसळला आणि त्यानंतर आई त्याला दवाखान्यात घेऊन गेली आणि डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या तेव्हा कळले की त्याला गंभीर आजार आहे आणि त्याला अर्धांगवायू झाला. आता त्याची आई रुग्णालयांना आवाहन करत आहे, की कृपया अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

अशा परिस्थितीत टेस्ट नक्की करा. कारण माझ्या मुलाच्या बाबतीत असं घडलं नसतं तर आज तो बरा असता. ही कथा प्रत्येक पालकांसाठी धडा आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मेलबर्नमधील रहिवासी जेसिका बायने सांगितलं की, माझा मुलगा मेसनला अनेक दिवसांपासून तीव्र वेदना होत होत्या.

सुरुवातीला मला वाटलं की तो 3 किमी धावून आला आहे, त्यामुळेच त्रास होत आहे. मात्र दोन दिवसांनंतर दुखण्यामुळे त्याने खाणंही बंद केलं. वेदना एवढ्या असह्य झाल्या की, सदैव आनंदी राहणारा माझा मुलगा अस्वस्थ झाला. रडायला लागला.

जेव्हा डॉक्टरांनी त्याला पाहिलं तेव्हा ते म्हणाले, की हे डिहायड्रेशनमुळे असू शकतं. पण तब्येत ठीक होण्याऐवजी आणखीच बिघडली. कारण अतिशय अजबत्याला उभा राहायला आणि चालायलाही त्रास होत होता. जेसिकाने सांगितलं की, मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि डॉक्टरांना तपासणी करण्यास सांगितलं.

पण ते तयार झाले नाहीत. रक्त तपासणी करून त्यांनी आम्हाला घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी मेसन घरातच कोसळला. मग आम्ही दुसऱ्या दवाखान्यात धाव घेतली.

दीर्घ प्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितलं, की वेदना व्हायरल मायोसिटिसमुळे होऊ शकतात, जो फ्लू नंतरचा संसर्ग आहे. जेसिका म्हणाली, माझा मुलगा आजारी नव्हता, तर संसर्गाचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही गुइलेन-बॅरे सिंड्रोमची (GBS) चाचणी घ्या. मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि मुलगा नाटकी असल्याचं सांगून त्याला घरी पाठवलं.

काहीच वेळात मुलाला अर्धांगवायू झालाजेसिका म्हणाली, डॉक्टरांनी नंतर एमआरआय स्कॅन केलं आणि असं आढळून आलं, की त्याला गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे. यात स्नायूंच्या कमकुवतपणामुळे शिरांना सूज येते. यामुळे पक्षाघात होतो. काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण शरीरात असह्य वेदना होतात आणि ते वेळीच समजलं तर बरं होण्यासाठी किमान सहा ते बारा महिने लागतात. बऱ्याच लोकांमध्ये ते बराच काळ बरं होत नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close