रिपाई ए च्या विद्यार्थी आघाडी यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी मानव महाजन यांची निवड.
यवतमाळ -(वार्ता)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व नेतेमंडळींनी सर्वांना मते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मानव महाजन यांची शिफारस केली त्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दि.०१ जानेवारी २०२४ रोजी यवतमाळ येथील दौऱ्यामध्ये मानव महाजन यांची स्वतः निवड पत्र देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची विद्यार्थी विंग मध्ये यवतमाळ जिल्हा रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपदी निवड करण्याची घोषणा केली त्यावेळेस शेकडो कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून पुष्प गुच्छा देऊन मानव महाजन यांना शुभेच्छा दिल्या रामदास आठवले यावेळेस बोलताना म्हणाले की सातत्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता सर्व कॉलेजेस मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्या शाखा तयार कराव्या व विद्यार्थ्यांचे जन आंदोलन उभारावे अशी सदिच्छा मानव महाजन यांना दिली यावेळेस उपस्थित महाराष्ट्राचे रिपाई नेते सुधाकर तायडे,विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष मोहन भोयर यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र मानकर, जिल्ह्याचे महासचिव गोविंद मेश्राम, जिल्हा प्रवक्ता नवनीत महाजन, रामदास बनकर, तेजस शिरसाट,दिपाली खंडारे,प्रथम फुलजले,लकी घायवान,डिके हनवते आधी शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी स्थानिक रेस्ट हाऊस मध्ये उपस्थित होत्या अशी माहिती जिल्ह्याचे महासचिव गोविंद मेश्राम यांनी माहिती दिली.