वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार वितरण सोहळा
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसदच्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या ४४व्या स्मृतिदिनी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षा गृहात दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:१५ वाजता वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारंभाचे अध्यक्षस्थानी *मा. ना. श्री धनंजय मुंडे,* *कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य* राहतील. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कर्तबगार व प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
*पुरस्कार प्राप्त शेतकरी- *पश्चिम महाराष्ट्र*:
श्री कपिल जयप्रकाश जाचक मु. जाचक वस्ती पो. भवानीनगर ता. इंदापूर जिल्हा पुणे
( केळी पिक)
श्री बजरंग सदाशिव साळुंखे मुक्काम पोस्ट बामनी ता. सांगोला, जिल्हा सोलापूर (ड्रॅगन फ्रुट)
*मराठवाडा*:
श्री. बाबासाहेब नारायण पडूळ
मु.लाडसावंगी रुस्तुमपूर ता. जि. छत्रपती संभाजीनगर (शेडनेट, भाजीपाला व फळबाग)
श्री अनिल तुळशीराम शेळके मु. कुंभेफळ ता. जि.छत्रपती संभाजीनगर
( दुग्ध व्यवसाय )
*उत्तर महाराष्ट्र*:
श्री विश्वासराव आनंदराव पाटील
मु. पो. लोहारा ता.पाचोरा जिल्हा जळगाव
( कोरडवाहू शेतीचे यशस्वी मॉडेल)
श्री. महेंद्र निंबा परदेशी मु. पो. कुसुंबा ता.जि. धुळे
( कांदा पीक)
*कोकण*:
श्री. संदीप बबन कांबळे मु. खानू ता. जि. रत्नागिरी
( भात उत्पादक)
श्री. मिथिलेश हरिश्चंद्र देसाई मु. लांजा ता. लांजा जी. रत्नागिरी
( फणस फळबाग)
*महिला शेतकरी*:
सौ. सविता वैभव नालकर
रा.चिंचविहिरे ता. राहुरी जिल्हा अहमदनगर (शेततळ्यातील मत्स्यपालन) *कृषी शास्त्रज्ञ:*
डॉ. दिगंबर नभु मोकाट वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
(औषधी व सुगंधी वनस्पती) *विदर्भ*:
श्री. रवींद्र जयाजी गायकवाड मु. पो. गायवड ता.कारंजा जिल्हा वाशिम
(सेंद्रिय खपली गहू व शेतीपूरक व्यवसाय)
श्री.अनिल शिवलाल किरणापुरे
मु. पो. लवारी ता.साकोली जिल्हा भंडारा
( भात व भाजीपाला उत्पादक)
*विशेष सन्मान:*
डॉ. दिनेश सेवा राठोड, चरित्र लेखक
मी. शक्ती नगर, मलकापूर जिल्हा बुलढाणा
(वसंतराव नाईक यांच्या राजकीय व कृषी औद्योगिक क्रांतीवर हिंदी व इंग्रजी भाषेत लेखन)
दुपारच्या सत्रात ३.०० वाजता श्री. जी. सी. मेश्राम व्याख्याता, बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र, चंद्रपूर- महाराष्ट्र शासन हे *बांबू पिकावर* मार्गदर्शन करतील. यावेळी सत्कारमूर्ती शेतकऱ्यांचे अनुभवकथन होईल.
वसंतराव नाईक स्मृतिदिन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष, माजी राज्यमंत्री डॉ.एन.पी. हिराणी, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी राज्यमंत्री अविनाश नाईक, प्राध्या. गोविंद फुके, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांचे मार्गदर्शनात सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषी भूषण दीपक आसेगावकर, उपाध्यक्ष धनंजय सोनी, कोषाध्यक्ष जय नाईक, सचिव प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार व पुरस्कार निवड समिती प्रमुख श्री. ययाती मनोहरराव नाईक यांनी केले आहे.