शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम
माजी नगराअध्यक्ष जगदिश काळे यांचे प्रतिपादन
वरूड/तूषार अकर्ते
शें.घाट येथील जनता हायस्कूल श्री.एन.जी.मोघे कनिष्ठ महाविद्यालय व जनता उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शें.घाट यांच्या संयुक्त विद्यमाने जनता शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक भवन मध्ये पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराअध्यक्ष जगदिश काळे तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष सतिश सोलव, अरुण काळे, सचिव मोहन गणोरकर, सहसचिव चंद्रशेखर टाकरखेडे, ज्येष्ठ संचालक राजेंद्र बेलसरे, अरुण फुटाणे, संजय बेले, ॲड. प्रभाकर सावरकर, प्रा.डॉ. रामदास फुलारी, प्रा.निलीमा मालपे, पर्यवेक्षक प्रा.अनिल बेलसरे, प्रा.सुनिल पोटदुखे तसेच पालक प्रतिनिधी म्हणून देवेंद्र देवघरे, विजय गोरडे, ॲड गजानन काळे, कविता अकर्ते, वैशाली सालबर्डे इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते. याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. सुमधुर आवाजात स्वागत गीत मृणाल पांडे या विद्यार्थिनीने सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक अनिल बेलसरे यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या व उपाय या विषयी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील विविध उपक्रम व शाळेच्या निकाला विषयी माहिती सांगितली. सभेला माता व पिता पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली, पालक प्रतिनिधी देवेंद्र देवघरे, गजानन काळे, अनिल आंडे, तुषार दवंडे, मिलन कचारे, वैशाली सालबर्डे यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ शिक्षक सुधाकर खडसे, प्रा. रामदास फुलारी इत्यादींनी पालकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती दिली व मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. मालपे यांनी आपल्या भाषणातून पालकांना बऱ्याच महत्वाच्या सूचना दिल्यात तसेच पालकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे. कुटुंब हीच जीवनाची पाठशाळा आहे. शिक्षण हे संस्कारावर अवलंबून असते म्हणून सर्वांनी मुलांना योग्य संस्कार देऊन ते भावी जीवनामध्ये कुठेही मागे राहणार नाहीत यासाठी सर्व घटकांनी विशेष काळजी घ्यावी असे प्रतिपादन जगदिश काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रफुल्ल बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.पोटदुखे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.