Uncategorized

एलसीबी चौकात वरली मटक्याला जोर

Spread the love

यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या स्टेट बँक चौक येथे सर्रास मटका अड्डा चालू असून अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे अत्यंत रहदारीचा असलेला हा रस्ता जुगार अड्डा म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या अड्ड्यामुळे स्टेट बँक चौकात वारंवार कायदा वसूव्यवस्था चा प्रश्न निर्माण झालेला आहे.पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड गुन्हेगारी रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करताना दिसते ;परंतु तसे असताना सुद्धा ह्या मटका अड्डा कसा काय जोरात सुरू आहे? याबाबत मात्र नागरिकांच्या मनात शंका आहे.
हा चौक अधिकच संवेदनशील असून काही महिन्यापूर्वीच या परिसरात खूणाची घटना घडली होती.अशा संवेदनशील चौकात मुख्य बाजारपेठ असून अनेक महिलांचा एजा त्या रोडने असतो अशातच एक ना अनेक घटना या चौकामध्ये वारंवार घडत असताना सुद्धा पोलिसांचे मात्र दुर्लक्ष असल्याचे आढळून येते. आजवर एकदाही त्या मटका अड्ड्यावर झाड पडली नसल्याचे बोलले जाते, त्यावरून कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे.शहर पोलीस आता तरी या प्रकाराने गंभीर्याने लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close