क्राइम

दोन दुचाकी चोरट्याला बेनोडा पोलिसांनी केली पांढूर्णातुन अटक

Spread the love

चोरटयाची जिल्हा कारागृहात रवानगी.

वरूड/तूषार अकर्ते

शनिवार दि.५ ऑगस्ट रोजी बेनोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाळेगाव पुनर्वसन हातूर्णा येथील फिर्यादी कुसरे यांच्या घरी ऋषिकेश पांडव यांचे गोडाऊन फोडून चोरट्याने ८ कट्टे हरभरा व मोटरसायल चोरून नेल्याची घटना दि.२ जून रोजी घडली होती.बेनोडा पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासा दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील
पांढूर्णा येथून संगम सिंग जगदीश सिंग बावरी व चरण सिंग गब्बू सिंग भादा या दोन चोरट्यांना दि.३ ऑगस्ट रोजी अटक करून वरुड न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपीना पोलिसांनी दि.५ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. शनिवारी दोन्ही दुचाकी चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही चोरट्यांची रवाणगी जिल्हा कारागृहात केली आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष शिरभाते , पोलीस कर्मचारी अतुल मस्के यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close