विदेश

Spread the love

              सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात की ते पाहिल्यावर तो व्हिडीओ  पाहून हसावे की रडावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडतो.  या व्हिडिओत लग्नाचे व्हिडीओ देखील असतात. त्यात  अनेकवेळा वरमाला टाकताना वराच्या मित्राकडून काही  कॉमेंट्स झाल्यास येन वेळी वधूचा लग्नास नकार, किंवा  मुलगा काळा असल्याचे करण सांगत वरात परत पाठवणे  असले प्रकार तुम्ही नेहमीच वाचत असाल पण लग्नाच्या वेळेवर वराला  वधु कडून लाथाबुक्क्यांनी मारहाण कधीच ऐकली नसेल पण एका लग्नात असे घडले.

लग्न हा असा दिवस असतो जेव्हा वधू आणि वर सर्वात जास्त काळजी घेतात की ते सर्वात सुंदर दिसावेत आणि त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. बहुतेकलोक सामान्य पद्धतीने लग्न सोहरा साजरा करतात.

असे बरेच लोक आहेत जे हे क्षण खास बनवण्यासाठी काहीतरी अनोखे करतात, जसे की पाण्यात बोटीवर लग्न करणे किंवा हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेणे. विचित्र गोष्टींमुळे हे लोक व्हायरल होतात. पण अलीकडेच एका जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अतिशय विचित्र एन्ट्री घेतली. या वेळी वधू आणि वराने एंट्री घेतल्यावर सर्वकाही सुरळीत असते. मात्र क्षणातच असं काही होत जे पाहून आलेल्या पाहुण्यांना देखील धक्काच बसतो. वधू आणि वर मंचावर आल्यावर एकाएकी वधू वराला उचलते आणि WWF स्टाईल मध्ये त्याला चांगलेच धुवून काढते.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजते की वराला खूप दुखापत झाली असावी. मुलगी आधी वराच्या पोटात लाथ मारते, नंतर त्याची मान पकडून उलटे फेकते. ही WWE ची चाल आहे असे दिसते, या दरम्यान तेथे एक रेफरी देखील दिसतो जो तीन तीन पर्यंत मोजतो आणि वधूला विजेता घोषित करतो.

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर तो झपाट्याने व्हायरल झाला. लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close