हनुमान नगरातील वलीसाहेब रोडची दुर्दशा,घाणीचे साम्राज्य
जनतेचे आरोग्य धोक्यात, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष, जनता मात्र त्रस्त.
नेर:- नवनाथ दरोई
नेर शहराला सुशोभित करण्यासाठी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु हिंदू मुस्लिमांच्या श्रद्धास्थान असलेले वलीसाहेबाच्या दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मात्र गेल्या अनेक वर्षापासून दूर्दशा झाली आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे तेथील नागरिकाचे म्हणणे आहे.वाई ढेका रोडवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून दोन्ही बाजूचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. तेथील नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करितानां तारेवरची कसरत करावी लागते. याबाबतचे निवेदन नेर नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांना देण्यात आले. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे तेथील जनतेचे मत आहे. या भागातील नाल्या अरुंद असून या नालीतील घाण पाणी तेथील घराघरात घूसत असल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वाई ईजाऱ्याला याच मार्गाने येणे जाणे करत लागत असल्याने प्रवाशांना दणके खात खात ये जा करावे लागते. पावसामुळे रोडवरील खड्ड्यात पाणी साचल्याने रात्रीला हे खड्डे दिसून येत नसल्याने अनेकदा वाहन पडून अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहे. या अपघातामुळे लोकांना गंभीर दुखापती झाली. या रस्त्यावरून चालताना अनेकदा जीव मुठीत घेऊन चालावा लागते. या भागात वस्ती असल्यामुळे भाजीविक्रेते या मार्गाने जात असताना लोटगाडीचा चक्का खड्ड्यात गेल्याने गाडीला धक्का बसुन अनेकदा भाजीपाला कडेला असलेल्या नालीत जाऊन पडत असल्यामुळे उगाच त्या चिल्लर विक्रेत्याला नुकसान सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने या रत्याची दुरुस्ती करून द्यावी असे तेथील जनतेचे मागणी आहे.यावेळी अजित खान,अब्दुल मन्नान,शेख भुऱ्या,कुरसद अली,अब्दुल राजीक,जाकिर खान,ताणू सुरजूसे,बबूल खान,टिपू शेख अपस्थित होते.