बारी समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार यांचे मार्फत निवेदन सादर
बारी समाजात नाराजीचा सुरु
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
गेली तीन महिन्यापूर्वी संत गजानन महाराज शेगाव नगरीमध्ये देशातील समस्त बारी समाज बांधवांचे उपस्थितीत व प्रमुख मान्यवंरांचे उपस्थितीत न भूतो न भविष्यतो असे लाखो बारी समाज बांधवांचे उपस्थितीत अधिवेशन संपन्न झाले, ह्या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री, व दोन्ही उपमुख्यमंत्री हे आमंत्रित होते परंतु काही कारणास्तव ते येऊ न शकल्यामुळे आमदार संजयजी कुटे, व आमदार प्रवीणजी दटके ह्यांनी उपमुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणवीस ह्यांची समाजाप्रती असलेली आस्था व समाजाच्या प्रेरित असलेल्या मागण्या ह्या सर्वतोपरी सोडवण्यासाठी कठीबद्ध असल्याचे आश्वासन सर्व समाज बांधवांचे उपस्थितीत व्हिडीओ क्लिप द्वारे सादर केले होते,त्या मुळे सर्व बारी समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या ,त्या बाबीला तीन महिने झाले असतांना सुद्धा शासनाकडून बारी समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांची कोणतीही दखल शासनाद्वारे घेतल्या गेली नाही, त्यामुळे राज्यातील समस्त बारी समाजामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे
बारी समाजाच्या मागण्यामध्ये श्री संत रुपलाल महाराज ह्यांचे राष्ट्रीय स्मारक, राष्ट्रसंताचा दर्जा व शासनदरबारी नोंद, समाजाच्या आर्थिक उन्नती साठी बारी समाज आर्थिक विकास महामंडळ
स्थापन करण्यात यावे, पानपिंपरी यांना पिकाला दर्जा व पीक विम्यामध्ये समावेश करून प्रलंबित पूर्वी च्या रोजगार हमी योजने मधून अनुदान सुरु करावे, ह्यासाठी मंत्रालय स्तरावर त्वरित संभंधित विभागाबरोबर नियोजन बैठक लावावी अशा मागण्याचे पत्र तहसीलदार ह्यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले
ह्याप्रसंगी निवेदन देतांना मनोहर मुरकुटे, दिनेश भोंडे, संजय नाठे, निलेश ढगे, गजानन धुळे, सुनील माकोडे, सतीश ढगे,विक्रम सातपुते, मंगेश टिपरे, मंगेश पाटील, आकाश गुजर, ओम माकोडे, सागर दातीर, दीपक धर्मे, सुभाष धुळे,नंदकिशोर पाटील, विनोद पाटील, राजेंद्र पाटील,अक्षय धुळे, विलास नाठे,ई समाज बांधव उपस्थित होते
सदरची निवेदन चळवळ राज्यातील संपूर्ण जिल्हा तालुक्का स्तरावरून उभारण्यात आली असून समाजाचे ह्या मुख्य बाबी बाबत शासनाने गंभीरतेने न घेतल्यास आगामी काळात समाज हा कोणती दिशा ठरवणार हे येणारा काळं, वेळ ठरवेल हे निश्चित।