आदिवासी आश्रमशाळेचे नवीन वेळापत्रक रद्द करून जुनेच वेळापत्रक लागू करा
सहा आश्रम शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन
संध्याकाळ आणि सकाळच्या जेवणामध्ये तब्बल 18 तासाचे अंतर
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद : शासकीय व अनुदानित आश्रम शाळांची वेळ 11:00 ते 5:00 करण्यासाठी सुमारे 300 पालकांनी घेतली प्रकल्प अधिकाऱ्याची भेट . घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेच्या वेळापत्रकामध्ये 10 जुलै 2023 पासून शाळेची वेळ 11 ते 5:00 ऐवजी सकाळी 8:45 ते 4:00 अशी करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ सकाळची 12:30 ते 1:30 अशी करण्यात आली. सकाळी 8:00 वाजता विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जातो. परंतु सकाळचा नाश्ता, व दुपारचे जेवण, यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर असल्यामुळे .लहान मुलाला भूक लागते. पालक ज्यावेळेला शाळेमध्ये भेट देतात. त्यावेळेला अनेक मुलं त्यांना बाहेरून खाण्यासाठी बिस्किट चिवडा खाऊ आणायला सांगतात .त्यावेळेला अशी गोष्ट पालकाच्या निदर्शनास आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या वेळेमध्ये बदल करावा. व शाळेची वेळ 11:00 ते 5:00 करावी यासाठी पुसद प्रकल्प अंतर्गत सर्व आश्रम शाळेतील मोठ्या प्रमाणात पालक ,प्रकल्प कार्यालय पुसद येथे आले होते .त्याचबरोबर शासनाने नवीन आकृतीबंधानुसार आश्रम शाळेवरची स्वयंपाकी व कामठी ही पदे 50% प्रमाणात कमी केल्यामुळे. विद्यार्थ्यांना गैरसोय होत आहे. पुसद प्रकल्पातील सर्वच आश्रम शाळेमध्ये पटसंख्या चांगली असल्यामुळे व गुणवता पूरक अध्यापणामुळे शैक्षणिक सुधारणा होत आहेत .इयत्ता अकरावी बारावी विद्यार्थ्यासाठी NEET चे वर्ग, तसेच इंग्रजी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस, अशा नाविन्यपूर्ण योजना विभागाने राबविल्या आहेत. परंतु नवीन आकृतीबंधानुसार शासनाने नियमित कर्मचारी मोठ्या प्रमाणात कमी केले. कर्मचारी अपुरे असल्यामुळे प्रशासन चालवताना मुख्याध्यापक व अधीक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत . ज्या ठिकाणी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू आहेत अशा ठिकाणी केअरटेकर ची आवश्यकता आहे . विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी शासनाने नर्स पद मंजूर केलेले आहे परंतु नर्स पद भरलेले नाहीत. जे कर्मचारी रोजंदारीवर लावलेले आहेत, त्यांचे मानधन निधी अभावी वेळेवर मिळत नाही. त्याचबरोबर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. या सर्व बाबींचा पालकांनी आढावा घेऊन काल दिनांक 31 जुलै 2023 ला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद येथे आले असता , सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र अहिर, यांची भेट घेऊन आपल्या समस्या व शाळेत विद्यार्थ्यांच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे होणारी हेळसांड थांबावावी व आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या, याकरिता वरिष्ठाकडे आपण पाठपुरावा करावा. तसेच आपल्या स्तरावरील समस्या लवकरात लवकर निकाली काढाव्या. अशाप्रकारे पालकांनी निवेदन दिले. महत्त्वाचे म्हणजे शाळेची वेळ ही 11 :00ते 5:00 करावे असे सर्व पालकांनी मागणी केली. यावेळी प्रकल्प समितिचे माजी अध्यक्ष तथा आदिवासी विकास परिषदचे जिल्हाध्यक्ष एड सुनील ढाले, समाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मेटकर विकास परिषदेचे महासचिव एडवोकेट रामदास भडंगे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा वडगाव शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चौरे, बबनराव आसोले, केशव मिरासे, कुसुमताई टाले, संतोष गारुलळे, गजानन टारफे, गजानन टाले, संदीप आढाव, यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा पुसद, शासकीय आश्रम शाळा कोर्टा, शासकीय आश्रम शाळा खैरखेडा, शासकीय आश्रम शाळा वसंतपूर, शासकीय आश्रम शाळा हर्षी, येथील पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.