क्राइम

शतपावली करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची पाठीमागून वार करून हत्या

Spread the love

सांगोला / नवप्रहार मीडिया नेटवर्क

             जनतेची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची असते.परंतु मागील काही काळापासून पोलिसांवर होणारे हल्ले पाहता ज्या विभागावर जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे तेच जर सुरक्षित नसतील तर मग आपले काय ? असा प्रश्न मनाला स्पर्शून जातो. सांगोला शहरात पोलीस उपनिरीक्षकाची मागून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) वासूद (ता.सांगोला)असे त्यांचे नाव आहे. ते जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यात वार करून खून केला. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close