Uncategorized
सुनील केदार यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नागपूर / विशेष प्रतिनिधी
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन देण्यास असमर्थता दर्शवली असून त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे केदार यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे केस जामिनावर सोडणं, हे चुकीचं असेल असं न्यायालयाने म्हटलं आहे.
बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळाप्रकरणी (NDCCB) मुख्य न्यायदंडाधिकारी कार्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदार यांनी निकालाविरोधात सत्र न्यायालायत धाव घेतली होती. शिक्षा झाल्यानंतर माजी मंत्री सुनील केदार सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार होते. आजच्या निर्णयानंतर आता त्यांना शिक्षा भोगायची तयारी करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक (NDCC) घोटाळा प्रकरणात दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील केदारांना मोठा धक्का बसला आहे.
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी न्यायालयाचे आदेश विधिमंडळाला पाठवले होते. यानंतर सुनील केदारांची आमदारकी रद्द करण्यात आली. कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.