मोहरम सवारीत विद्युत शॉक लागल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी
तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील मानोली या गावातील श्याम झिबल बावने वय 50 वर्ष आणि प्रशांत नारायण सोनुले वय 18 हे साखरा या गावी मोहरम सवारीचा कार्यक्रम असल्याने अनेक लोकांसोबत येऊन गावात मोहरमची सवारी केली. साखरा तेथील सवारी भक्त दिनेश जाधव यांचे घरी सवारी घेऊन निघतांना विद्युतच्या शॉर्टसर्किट झाल्यामुळे घरावरील टीनाला विद्युत प्रवाह असल्याने श्याम बावने आणि प्रशांत सोनुले यांचा नकळत त्यां विदूत प्रवाह विजेचा शॉक लागला.हे तेथील उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात येताच विलंब न करता त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे नेले असता तेथे श्याम झिबल बावणे वय 50 वर्ष यांचा अकस्मात मृत्यू
झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले आणि प्रशांत नारायण सोनुले यांची त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. मृत श्याम बावणे यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.या प्रकरणी बळीराम गुलाब बावणे वय ४० यांनी तक्रार दील्याचही कळते.