विद्यार्थ्यांना फेल पडलेल्या बसमधून भर पावसात उतरून दिले विद्यार्थी व जनतेने केले चक्का जाम आंदोलन
आर्वी / प्रतिनिधी
रसुलाबाद, सोरटा, पिंपळगाव, सालफळ या गावांवरून पुलगावला दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी जातात येतात, त्यात शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी दोघांचाही समावेश आहे.
मागील ५ वर्षांपासून प्रत्येक वर्षी बस करिता आंदोलन करून या विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्या मांडल्या जातात व नंतर वर्धा आगराला जाग येते व बस फेरी काही दिवस सुरळीत चालू होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचे हाल चालू झाले आहे, सरकारने विद्यार्थ्यांसाठी कितीतरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे, त्यात मुलींसाठी बस पास ही सुविधा उपलब्ध आहे म्हणून खेड्यातील मुली शिक्षणा साठी शहरात घरचे लोकं पाठवतात. नाहीतर खेड्यातील लोकांना रोजमजूरी करून मुलांना शहरातील शाळेत शिकविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.
या बस वेळेवर येत नसल्यामुळे कित्येक विद्यार्थी शाळेला येत नाही कारण दररोज 100 रुपये येणे जाणे करीत माय बाप खर्च करु शकत नाही.
जर विद्यार्थी पुलगाव ला शाळेत, महाविद्यालयात आले तर जाणून बुजून खराब बसेस या सर्व विद्यार्थ्यांसाठी लावल्या जातात.
आज तर ह्द झाली बस खराब झाली त्यामुळे विद्यार्थ्यांना बस कर्मचाऱ्यांनी बार पावसात उभे करून दिले आणि विद्यार्थी अर्धा ते पाऊण तास पावसात भिजले तरीसुद्धा बस आगार वाल्यांनी बस ची व्यवस्था केली नाही. तेव्हा राजेश सावरकर सरपंच रसुलाबाद, श्याम गुजर उपसरपंच निजामपूर टाकली, पालक देवेंद्र पोतले, अंकुश मनवर यांनी तिथे थांबून आगार प्रमुख पुलगाव पंधरे यांना बरेचदा फोनवर ही माहिती दिली, बस डेपो व्यवस्थापक वर्धा यांना पण वारंवार माहिती दिली, काहीही कार्यवाही होत नाही असे दिसताच सर्वांनी चक्का जाम आंदोलन चालू केले.
विद्यार्थी व सरपंच , पालक यांना दरवर्षी प्रत्येक वेळी आंदोलन करूनच पोलिसांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढुन न्याय दिल्या जातो.
हे असे कुठपर्यंत चालणार. यांनातर जर असेच चालत राहिले तर या पुलगाव बस स्थानक मधून कुठेही बस जाऊ देणार नाही. असे सांगण्यात आले.
यावेळी बस उपलब्ध करून दिली त्याबद्दल पोलिस प्रशासनाचे जाहीर आभार व्यक्त केले.