अधिक मासाच्या पुण्य पर्वावर शिव महापुराण कथा,
भारती महाराज महिला मंडळाच्या वतीने कीर्तनाचे आयोजन
भाविकांनी घेतला लाभ.
नेर:- नवनाथ दरोई
अधिक मासाचे महत्त्व जाणून नेर येथील दत्त मंदिरात गजानन महाराज पापडकर यांच्या मधून वाणीतून शिव महापुराणाचे महत्व कथा व किर्तनातून भाविकांना सांगण्यात आले, यावेळी महाराजांच्या कीर्तनाला दत्तोपंत भोयर, दीपक पापडकर, विश्वनाथ दोनोडे, बजरंग पापडकर, राजू गुल्हाने, पल्हाद ठाकरे,मधूकर साव, विलास गोजे, सुखदेव इंगोले, दिवाकर पाटमासे यांच्या वाद्यांनी महाराजाच्या किर्तनाला साथ दिली. किर्तन संपल्यानंतर शहरातून दिंडी निघणार होती परंतु सतत येणाऱ्या पावसामुळे दिंडी काढण्यात आली नाही. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सुमन गाढवे, सुमन तवाडे, बेबी काळे, गीता झोपाटे,विणा खोडवे, शालिनी जावरकर,सुधा देशमुख, शकुंतला बूराडे, सुमन मोकडकर,इंदू मलमकार, कुसुम जगताप, यशोदा इंगळे,निर्मला कोरे व भारती महाराज महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.