क्राइम

पैशे दुप्पट करण्याचे आमिष देत व्यापाऱ्यांचे अपहरण आणि हत्या

Spread the love

नागपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

             शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील दोन व्यापाऱ्यांना पैशे दुप्पट करण्याचे आमिष देत त्यांचे अपहरण करण्यात आले . आणि त्यांनतर दोघांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे. यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.”

 निराला कुमार सिंग (वय 43 वर्षे) आणि अंबरीश देवदत्त गोले (वय 40 वर्षे दोघे रा. एचबी टाऊन नागपूर) अशी मृतांची नावे आहे. आरोपींकडून हिस्लॉप कॉलेजजवळ असलेल्या चिटणवीस सेंटरमधून या दोन्ही व्यावसायिकांचे अपहरण करण्यात आले होते.

त्यानंतर दोघांना गोळ्या झाडून संपविण्यात आले. तळेगाव पोलिसांना एका व्यावसायिकाचा मृतदेह मिळाला आहे. खडका गावाजवळ वर्धा नदीच्या काठावर मृतदेह आढळून आला. नागपुरातील सोनेगाव आणि बर्डी पोलीस ठाण्यात व्यापारी बेपत्ता झाल्याचे दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

तपास सुरू असतानाच पोलिसांनी काही तासातच या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे. ओंकार महेंद्र तलमले, हर्ष आनंदीलाल वर्मा, दानेश दुर्गाप्रसाद शिवपेठ, लकी संजय तुरकेल आणि हर्ष सौदागर बागडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागपूरमधील दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर दोन्ही व्यापारी बेपत्ता असल्याची तक्रार बर्डी आणि सोनेगाव पोलीसात देण्यात आली होती. यानंतर दोन्ही व्यापाऱ्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले. दोघांचाही गोळी झाडून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील तळेगाव इथं नदी पात्रातून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close