सामाजिक

‘ हात ‘ आणि ‘ आधार ‘ फाऊंडेशन चा  पूरग्रस्तांना मदतीचा  ‘ हात ‘

Spread the love
धामणगाव रेल्वे / हितेश गोरिया
                        मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या कोसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थिती मुळे जिल्ह्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोपरा या गावात तर लोकांचे स्वयंपाकाचे भांडे , कपडे, गादया ,  यासह अनेक जीवनावश्यक वस्तू पुराची भेट चढल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघडयावर आले. ही बाब अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे , अमरावती येथील आधार फाउंडेशन तसेच श्रीमती नानकी बाई वाधवाणी विद्यालय यवतमाळ यांना कळल्यावर त्यांनी या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

हात फाउंडेशन च्या वतीने सकाळी नऊ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दत्तापूर चे ठाणेदार हेमंत ठाकरे व डॉ. महेश साबळे ( वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे ) यांच्या उपस्तितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून धामणगाव रेल्वे येथून  जमा झालेली विविध सामग्री ( कपडे, भांडी, धान्य )  हात फाउंडेशन च्या माध्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील कापरा या गावात पाठवण्यात आली त्यावेळी हात फाउंडेशन च्या सदस्यांनी धान्य ,कपडे, भांडी घेऊन पूरग्रस्त भागात प्रस्तान केले त्यावेळी त्यांच्यासोबत आधार फाउंडेशन चे सदस्य व नानकी बाई वाध वाणी विद्यालयातील प्राचार्य व कर्मचारी मिळून पूरग्रस्तांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली व सर्व पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू धान्य, कपडे ,भांडी, ब्लॅंकेट यासारखे वस्तू वाटून माणुसकीचा संदेश दिला पूरग्रस्तांनी हात फाउंडेशन धामणगाव रेल्वे आधार फाउंडेशन अमरावती व श्रीमती नानकी बाई वाधवाणी महाविद्यालयातील सर्वांचे आभार मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close