त्याने तिच्या समोर ठेवली ती अट आणि…..

सुरत / नवप्रहार मीडिया नेटवर्क
मुलांसाठी आई काहीही करायला तयार असते. आईच काळीजच तास असत. मुलांसाठी आई स्वतःचा जीव द्यायला देखील तयार होते. पण सुरत मध्ये जो प्रकार घडला ते वाचून असं वाटायला लागतं की खरच ही आई आहे काय ? कारण प्रियकराला मिळविण्यासाठी या निर्दयी मातेने आपल्या अडीच वर्षाच्या मुलाचा खून केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ही महिला मूळची झारखंड ची राहणारी आहे. आणि तीचे तेथील एका व्यक्ती सोबत प्रेमसंबंध होते.ती कामा निमित्ताने सुरत ला आली होती आणि येथे मजुरीचे काम करीत होती. तिने पोलिसात तिचा अडीच वर्षाचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी ला सुरुवात केली. महिलेला विचारपूस केली पण महिला पोलिसांना सत्य काय ते सांगत नव्हती.
नयना मंडवी असे तिचे नाव असुन ती सुरतच्या दिंडोली भागातील कंस्ट्रक्शन साईटवर कामाला होती. पोलिसांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. डॉग स्क्वॉडच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्या साईटवर मुलगा कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपी महिलेला वारंवार प्रश्न विचारले. पण तिने पोलिसांसमोर खोटेपणा सुरूच ठेवला.
पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर महिलेने सांगितलं की, प्रियकराने तिच्या मुलाला किडनॅप केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत महिलेच्या प्रियकराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो काही सुरतमध्ये सापडला नाही. पोलिसांनी त्याला संपर्क साधला तो म्हणाला की, मी कधीच सुरतमध्ये नव्हतो. त्यामुळे पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणताना चांगलीच दमछाक झाली.
पोलिसांनी पुन्हा एकदा महिलेच्या मुलाचा शोध घेण्यासाठी काम करत असलेल्या ठिकाणी तपास केला. तिथे त्यांना कोणताही पुरावा हाती लागला नाही. त्यानंतर पोलीस वारंवार त्या महिलेला प्रश्न विचारत राहिले. त्यानंतर पोलिसांसमोर तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि मुलाला मारल्याची कबुली दिली. मृतदेह कुठे लपवला आहे याबाबत विचारलं असता तिने पोलिसांना पुन्हा खोटी माहिती दिली.
आरोपी महिलेने पहिल्यांदा मुलाला खड्ड्यात पुरल्याचं सांगितलं. तिथे शोध घेतला असताना तिथे काहीच आढळून आलं नाही. त्यानंतर महिलेनं मुलाला डबक्यात फेकल्याचं सांगितलं. तिथेही पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवला आणि आरोपी महिलेनं मुलाच्या मृतदेह कंस्ट्रक्शन करते असलेल्या टॉयलेटच्या टाकीत फेकल्याची कबुली दिली. पोलिसांना त्या ठिकाणाहून मुलाचा मृतदेह सापडला.
या कारणासाठी तिने मारले मुलाला –
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मुलाला का मारलं असा प्रश्न विचारला. त्यावर तिने दिलेली कबुली ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मुळची झारखंडची आहे. तिचा प्रियकर झारखंडमध्ये राहतो. पण मुलासह तिला जवळ करणार नाही असं त्याने तिला सांगितलं होतं. त्यामुळे प्रेमासाठी तिने मुलाला मारलं.
इतकंच काय तर गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी दृश्यम चित्रपट पाहिला. मृतदेह कसा लपवायचा याबाबत माहिती घेतली. चित्रपटात मृतदेह पोलिसांना काही करू सापडत नाही. त्यामुळे आरोपीला अटक करणं कठीण होतं. महिलेला वाटलं की खऱ्या आयुष्यात असंच होऊ शकतं. पण पोलिसांनी गुन्ह्याची उकल तिला बेड्या ठोकल्या.