रेल्वेत महिलेची छेड काढणाऱ्या तृतीय पंथीयांवर गुन्हा दाखल
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
रेल्वेत तृतीयपंथीयांचा धुमाकूळ असतो.प्रवाश्यांना पैशे मागणे त्यासाठी जबरदस्ती करणे न दिल्यास शिवीगाळ करणे हा त्याचा उपक्रम . या विरोधात तक्रार केल्यास ते 2- 4 दिवस आपला कार्यक्रम बंद ठेवतात. आणि त्यांनतर तोच प्रकार सुरू होतो. वांद्रे प्रवासा दरम्यान महिला बोगीतून प्रवास करणाऱ्या महिले सोबत लाजिरवाना प्रकार घडला आहे. तृतीय पंथीयने या महिलेकडे पैशाची मागणी केली.त्यावेळी तिने महिलेच्या शरीराला स्पर्श देखील केला.
याप्रकरणी महिलेने वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून वांद्रे रेल्वे पोलिसांनी तृतीयपंथीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी या महिला डब्यातून प्रवास करत असताना लोकल माहीम स्थानकातून सुटल्यानंतर साधारणपणे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तृतीयपंथीयाने फिर्यादी यांच्या जवळ येऊन पैसे मागण्यासाठी हाताने स्पर्श केला. हात लावू नको, तू स्त्री आहे की पुरुष असे म्हणत फिर्यादीने त्या तृतीयपंथीयास दूर करण्याचा प्रयत्न केला.शिवन्या सारला उर्फ कौशल्या (वय 24 वर्ष) असं गुन्हा दाखल झालेल्या तृतीपंथीचे नाव आहे. पोलिसांनी कलम 41 (अ ) (1) प्रमाणे तृतीयपंथीस नोटीस दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी एक 44 वर्षीय महिला प्रवासी मरीन लाइन्स स्थानकातून अंधेरीला जाण्यासाठी बोरीवली ट्रेनने प्रवास करीत होती.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वांद्रे रेल्वे पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी व्यक्ती गुन्ह्याच्या पुढील तपासात सहकार्य करील याची खात्री झाल्याने प्रत्यक्षात अटक न करता फौ. प्र. स. कलम 41 (अ ) (1) प्रमाणे नोटीस दिली आहे.दरम्यान, पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करत परिधान केलेली साडीवर केली. त्यामुळे फिर्यादी महिलेने सांताक्रूझ रेल्वे स्थानकात उतरून आरोपी तृतीयपंथी विरोधात पोलीस अंमलदाराकडे तक्रार केली. महििलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फिर्यादी व आरोपी तृतीयपंथीस वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात हजर केले.