गटशिक्षणाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करा अन्यथा आंदोलन – युवासेना अंकुश कावडकर यांची मागणी
आदिवासी बहुल भागात शिक्षकांनीच वाजविले शिक्षणाचे बारा
अमरावती / प्रतिनिधी
धारणी तालुक्या मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक गैरहजर असून आळीपाळीने कामे करीत असल्याचे आढळून आले आहे. शिक्षकच शाळेला दांडी मारत असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळेमध्ये बघायला मिळत आहे. काही युट्युब चॅनल च्या माध्यमातून ही माहिती प्रकाशात आली आहे. युट्युब चॅनलच्या प्रतिनिधींनी तालुक्क्यातील शाळेचा सर्व्हे केला असता त्या मध्ये ही धक्कादायक माहिती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. इयता सातवी ते आठवी वर्गातील विध्यार्थ्याना लिहता व वाचता येत नसल्याचे प्रतिनिधींनी शासनाच्या लक्षात आणून दिले आहे. देशाच्या प्रधानमंत्री व राज्याच्या मुख्यमंत्री यांची नावे विचारली असता विद्यार्थ्यांना सांगता येत नव्हती. विद्यार्थी एकमेकांकडे आश्चर्याने बघत होती. शिक्षकांचा चेहरा लालबुंद झालेले होता. आदिवासी बघूल भागामध्ये शासनाकडून दुप्पट पगार असून शासनाच्या सुख सुविधा सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पण ह्या शिक्षकांनीच शिक्षणांचे बारा वाजविले की काय असा प्रश्न तेथील शिक्षित व्यक्तींना पडलेला आहे. शिक्षणाच्या बाबत शिक्षक प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येते. शासन प्रशासन आदिवासी बहुल भागात विद्यार्थ्याणकरिता सर्वतोपरी मदत करीत आहे. शिक्षक मात्र आपल्या गलेलठ्ठ पगारात खुश असून आदिवासी विध्यार्थ्याच्या भविष्याचे काहीही घेणेदेणे नसल्यासारखे मनमानी कारभार चालवीत असल्याचे दिसत आहे. अनेक शाळेतील शालेय पोषण आहारामध्ये अळ्या व भोंग आढळल्या आहेत. शिक्षकांना या संदर्भात विचारले असता आम्हाला वरिष्ठांना खुश ठेवायांचे असते. यासाठी आम्हा शिक्षकांना दर महिन्याला गटशिक्षण अधिकारी यांना ठरलेली रक्कम द्यावी लागत असल्याने आम्ही मर्जीनुसार वागू शकत असल्याचे मोठे भयाण वास्तव समोर आले आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक जिल्हा परीषद अमरावती यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाचे उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी निवेदन दिले आहे. सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्याच्या भविष्याशी व आरोग्याशी खेळणा-या गटशिक्षण अधिकारी यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा युवासेना स्टाईलने आम्ही तीव्र आंदोलन छडू असा अल्टिमेट सुद्धा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शुभम जवंजाळ, अंकुश सोलव, अंकुश साबळे, नवनीत उमेकर, अनुप मानकर आधी युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.