पाकिस्तान ला इस्रायल – इराण – अमेरिका युद्धात उतरावेच लागेल ? काय आहे कारण

सौदी अरब / विशेष प्रतिनिधी
मध्य पूर्वेत घमासान युद्ध सुरू आहे. ईरान कुठल्याही स्थितीत मागे यायला तयार नाही. तो इस्त्रायल सोबत आखाती देशावर देखील हल्ला करत आहे. ईरान ने सौदी अरेबियाच्या यान्बू बंदरातील समरेफ तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ले झाले आहेत.
इराणने सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यामुळे हवालदिल झालेल्या सौदी अरेबियाने थेट लष्करी कारवाईचा अवलंब करण्याचा इशारा दिला आहे. आता पाकिस्तानकडे पर्याय नाही. पाकिस्तानला युद्धात उतरावेच लागणार? इरणावर हल्ले करावेच लागणार? सौदी अरेबियाने केली पाकिस्तानसोबतच्या कराराची घोषणा केली आहे.
सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबतच्या आपल्या संयुक्त सामरिक संरक्षण कराराचा वापर करण्याची घोषणा केली आहे. सौदीचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांनी रियाधमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये या कराराच्या अंमलबाजवणीची घोषणा केली आहे.
सौदीचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा संरक्षण दलप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची भेट झाली. सौदी अरेबियावरील इराणी हल्ले आणि आमच्या संयुक्त सामरिक संरक्षण कराराच्या चौकटीत ते रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. या कारवाया प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेला धोका निर्माण करतात.
पाकिस्तान इराणविरुद्धच्या युद्धात उतरणार का?
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबरमध्ये एका संरक्षण करार झाला होता. या संरक्षण करारानुसार, एका देशावरील हल्ला हा दुसऱ्या देशावरील हल्ला मानला जाईल. सौदीचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांनी या कराराच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. बैठकीनंतर खालिद बिन सलमान यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबतच्या आपल्या सामरिक परस्पर संरक्षण कराराचा वापर केला आहे. कारण इराण सौदी अरेबियावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे, ज्यात तेल सुविधा आणि रियाधमधील अमेरिकी दूतावासावरील हल्ल्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सौदीचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद यांनी कराराअंतर्गत प्रतिशोधात्मक उपाययोजनांमध्ये समन्वय साधण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि संरक्षण दलप्रमुख, फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची भेट घेतली. इराणचे हल्ले प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेला धोका निर्माण करतात, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे, आता प्रश्न असा आहे की पाकिस्तान या युद्धात ओढला जाईल का.
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. दोन बंधुत्वपूर्ण देशांमधील सामरिक संरक्षण कराराअंतर्गत, खालिद बिन सलमान आणि आसिम मुनीर यांनी सौदी अरेबियावर होणाऱ्या इराणी हल्ल्यांवर प्रदेशाच्या सुरक्षेला तसेच स्थिरतेला हानिकारक असलेले हे हल्ले रोखण्याच्या मार्गांवर चर्चा केली. इराण हल्ले टाळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, इराण सातत्याने आक्रमक हल्ले करत आहे. इराण किंवा त्याचे हस्तक असलेल्या हुथी बंडखोरांकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे सौदी नेतृत्वाने युवराज मोहम्मद बिन सलमान आणि त्यांचे वडील, राजा सलमान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुरक्षा लक्षणीयरीत्या वाढवली आहे. रियाधने यापूर्वी तेहरानला स्पष्टपणे इशारा दिला होता की, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षादरम्यान सौदी अरेबिया तटस्थ राहिल्यास त्याच्यावर हल्ला होणार नाही. तथापि, इराणने सौदी अरेबियाला सांगितले की, इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले झाल्यास ते सौदी अरेबियावर हल्ला करतील. सौदी अरेबियाची लक्ष्मणरेषा ही होती की, जर त्यांच्या नागरी लक्ष्यांवर हल्ला झाला, तर ते इराणवर हल्ला करतील, आणि आता नेमके तेच घडत आहे. संरक्षण तज्ज्ञ बर्नार्ड हेकेल म्हणाले की, सौदी नेते आता “काय करावे आणि प्रत्युत्तर द्यावे की नाही” याचा विचार करत आहेत. जर सौदी अरेबिया युद्धात उतरला, तर पाकिस्तानलाही त्यात सामील होण्यास भाग पडेल. दोन्ही देशांमधील विद्यमान संरक्षण करारामुळे त्याला तसे करण्यास भाग पाडले जाऊ शकते. बुधवारी, तुर्की, संयुक्त अरब अमिरात आणि कतारसह डझनभर देशांचे परराष्ट्र मंत्री रियाधमधील एका हॉटेलमध्ये एकत्र जमले होते.




