वाढीव शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची सेवा पुस्तीकेत नोंदवा.
सहाय्यक शिक्षक दिपक दुपारे यांचे आमरण उपोषण.
वरूड/तूषार अकर्ते
वाढीव शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची सेवा पुस्तीकेत नोंद घेण्याकरिता लोणी येथील स्व. केशवरावजी क्षिरसागर जागृत विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक दिपक दुपारे यांनी २३ जुलै पासुन आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा जागृत नवयुवक शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांना एका निवेदनाव्दारे दिला होता.
सहाय्यक शिक्षक दिपक दुपारे यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले होते की मी जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड व्दारा संचालित स्व.केशवरावजी क्षिरसागर जागृत विद्यालय लोणी येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे.माझी नियुक्तीची व्यावसायीक पात्रता डि.एड. असल्यामुळे मी पूर्व माध्यमिक विभागाला अध्यापनाचे काय करीत आहे.माझी १० जुलै १९९० पासुन संस्थे अंतर्गत जागृत कन्या शाळा वरुड येथे अनुजाती या प्रवर्गात नियुक्ती करण्यात आली. शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी मी २७ मे १९९२ ला मुख्याध्यापिका जागृत कन्या शाळा वरुड मार्फत संस्थेकडे शैक्षाणिक पात्रता वाढविण्याची परवानगी मिळण्याकरीता अर्ज सादर केला होता व त्यानंतर माझी व्यावसायिक (बी.एड) पात्रता वाढविण्याची परवानगी
मिळण्याकरीता १४ ऑगष्ट २०१९ ला मुख्याध्यापिका स्व. केशवरावजी क्षिरसागर जागृत विद्यालय लोणी यांचे मार्फत संस्थेकडे अर्ज केला होता. आज रोजी माझी शैक्षणिक पात्रता बी. ए.ङबी.एड.असुन आजपर्यंत मी मुख्याध्यापक यांचे मार्फत संस्थेकडे सन् २०१७ पासुन शैक्षणिक पात्रतेची सेवापुस्तीकेत नोंद घेण्यात यावी म्हणुन अनेक वेळा अर्ज केलेत परंतु आजपर्यंत नोंद घेण्यात आलेली नाही हा माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझी वाढीव शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची नोंद सेवा पुस्तीकेत घेऊन मला ‘क’ प्रवर्गात समाविष्ट करावे व सेवाजेष्ठता यादीत त्याची नोंद २२ जुलै २०२३ पर्यंत घेण्यात यावी अन्यथा मी २३ जुलै २०२३ ला सकाळी १० वाजता पासुन स्व. माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुड च्या मुख्य प्रवेश व्दाराचे बाजुला आमरण उपोषणाला बसेल असा इशारा देण्यात आला होता. सदरील मागण्या मान्य न झाल्याने दुपारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.