पुर परिस्थितीमुळे घाटंजी तालुक्यातील दोन हजारांवर नागरिकांचे स्थलांतर
अडाण,वाघाडी,पैनगंगा, जलस्तर वाढल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
काल घाटंजी तालुक्याला पुराने पार झोडपुन काढले.सतत दोन तीन दिवस पडलेला पाऊस व तालुक्यातील निळोणा,चापडोह,वाघाडी प्रकल्प तुडूंब भरल्याने त्यातून झालेला पाणी विसर्ग यामुळे दोन हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली.पावसामूळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाऊन पिकनुकसान होऊन शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले. एकट्या मुर्ली गावातील १५६ कुटूंब पुरबाधीत असल्याचे शासनाचा प्राथमिक अंदाज असून येथिल लोकांना स्थलांतरित करण्यात आले.तालुक्यातील खापरी,मुर्ली,कोळी,मानुसधरी,कवठा,डोंगरखर्डा, कापसी,येडसी,स्वांगी,चांदापुर, व ईतरही भागात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले.अतिवृष्टीमुळे उध्दभवलेल्या परिस्थिती पाहता घाटंजी तहसिलदार शेलवटकर, न.प.मुख्याधिकारी अमोल माळकर,मंडळ अधिकारी,तलाठी व स्थानिक रहिवासी मदतीने प्राथमिक मदत करण्यात येऊन पूरग्रस्त भागातील प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.