साथरोग व किटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याचे आवाहन
मोर्शी – दरवर्षी साथरोगजन्य परिस्थिती निर्माण होऊन आजारी पडण्याची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते, आजारी पडून उपचार करण्यापेक्षा
आजारी पडू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्यास रोग व किटकजन्य आजाराची तीव्रता कमी करण्यास नक्कीच मदत होईल.
•परिसर व घर स्वच्छ ठेवावा, उघड्यावरचे व शिळे अन्न खाणे टाळावे, माशापासून हगवणीच्या आजाराचा प्रसार होत असल्याचे खायचे पदार्थ उघडे ठेवू नये, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, पावसाळ्यात उकळून थंड केलेले किंवा निर्जतुकीकरण केलेले पाण्याच्या पिण्यासाठी वापर करावा,गावातील उकंडे गावाबाहेर दूरवर असावे कारण त्या तयार होणाऱ्या संडफलया पासून चंडीपुरा नावाचा जीव घेणारा आजार होतो, नळगळती आढळल्यास ताबडतोब सूचना संबंधित नगरपालिकेला द्यावी.
• घसादुखी , तीव्र ताप अंगदुखी सर्दी व खोकला यासारखी लक्षणे दिसून आल्यास शासकीय दवाखान्यातच उपचार करून घ्यावा. स्वाईन फ्लूचे औषध केवळ शासकीय दवाखान्यातच मोफत उपलब्ध आहे, डेंगू ,हिवताप व चिकनगुनिया यासारखे डास व स्वच्छ पाण्यात तयार होत असल्यामुळे घरातील टाके, राजन, माठ व ईतर भांडी आठवड्यातून एक दिवस घासून-पुसून स्वच्छ कराव्या व कोरडा दिवस पाळावा, परिसरातील स्वच्छ पाण्याची डबकी नष्ट करावी, नाल्या वाहत्या कराव्यात कारण नालीतील घाण पाण्यात हत्तीरोगाचे डास तयार होते, परिसरातील टाकाऊ वस्तू पाणी साठवून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी उदा. टायर,भरण्या ,डबे इत्यादी पाण्यातील चांमडोक म्हणजेच डासांच्या आळ्या होय. त्यामुळे चांमडोक असलेल्या साठवणीतील पाणी नालीत टाकू नये उघड्यावर फेकून द्यावे, डेंगू चे डास दिवसा चावतात त्यामुळे दिवसा झोपतांना सुद्धा मच्छरदाणीचा वापर करावा, घरातील खिडक्यांना जाळी लावावी. संडासाचा गॅस पाईपलाईन पातळ कापड किंवा जाडी बांधावी पाण्यातल्या डबक्या गप्पी माशांचा (डास अल्या खाणार्या) वापर करावा. ओवरहेड टैंक व घर धूम वापरायची पाण्याची टाकी पाणी साठी झाकून ठेवावे डास प्रतिबंधक साधण्याच्या वापर करावा. उदाहरणार्थ मच्छरछापअगरबत्ती ,ओडोमास ट्यूब इत्यादी.
•तीव्र ताप असल्यास रुग्णांचे अंग ओल्या कापडाने पुसून घ्यावे रुग्णालय जवळच्या सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात उपचार करून रक्ताची तपासणी करून घ्यावी असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद पोतदार, वैद्यकीय अधिकारी डॉ .सचिन कोरडे यांनी केले आहे.
या मोहिमेमध्ये हिवताप व हत्तीरोग कर्मचारी श्री.विनय शेलुरे ,प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे , विनोद पवार ,सुधाकर कडू ,नंदू थोरात ,नागेश उडगे, ऋषि दहेकर, गजानन शिवणकर, अक्षय शेवाळे यांचा यामध्ये सहभाग आहे.