कष्टाची अर्धीभाकर खाऊ मात्र पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या सोबत एकनिष्ठ राहू – निलेश धुमाळ
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या आर्वी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक संपन्न

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी, दि.२३:- पक्षातील संधीसाधु पळालेत, ते पळाले असले तरी, ज्यांना काहीच मिळाल नाही असे स्वाभीमान बाळगणारे शिवसैनीक आजही कायम आहेत. आम्हाला काही मिळाल नाही तरी चालेल, कष्टाची अर्धी भाकर खाऊ मात्र पक्ष प्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहु हिच त्यांची भावना या मागची आहे असे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी प्रतिपादन केले.
शनिवारी (ता.२२) येथील विश्राम गृहात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्याची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत ते पदाधिकारी व शिवसैनीकांना मार्गदर्शन करीत होते.
शिवसेनेचे वर्धा जिल्हा प्रमुख प्रशांत शहरागडकर, अनील देवतारे, विधानसभा क्षेत्राचे सहसपर्क प्रमुख प्रफूल भोसले, उत्तम आयवळे, भालचंद्र देवरुखकर, रुपेश कांबळे, उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, युवा सेना प्रमुख सुर्या हिरेखण, महिला संघटन तालुका प्रमुख रिता लोखंडे, शहर प्रमुख मिना ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थीतीत हि बैठक पार पडली.
पुढे बोलतांना त्यांनी, येत्या दोन, तिन महिण्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणूकीची तयारी करा पक्ष संघटना मजबुत करा, गावागावात बैठका लावा, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आमची तयारी आहे. “होवून जावूदे चर्चा” हा कार्यक्रम राबवू आणी आपण सर्व मिळुन विधानसभा क्षेत्रात शिवशाही निर्माण करु अशी अपेक्षावर्तवीली. २७ जुलैला पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी सामाज उपयोगी कार्यक्रम राबवून मोठ्या प्रमात राबवावे अशा सुचना दिल्या.
जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर, शिवसैनीक नानकसींग बावरी यांनी सुध्दा यावेळी समयोचीत मार्गदर्शन केले.
उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव यांनी प्रस्तावणा मांडतांनी आर्वी विधानसभा क्षेत्राच्या आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्याची माहीतीची संपुर्ण माहिती दिली. तर, संचालन शहर प्रमुख दिपक लोखंडे यांनी केले.
जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख यांचेसोबत थेट सवांद साधुन पक्ष संघटनेची संपुर्ण माहिती जाणुन घेतली आणी गावागावात पक्ष संघटना मजबुत करून पक्षाचा कार्यक्रम गावागावात पोहचवीण्याच्या सुचना दिल्या
यावेळी माजी नगरसेवक प्रल्हाद थोरात, मुर्लीधर पवार, स्व. मधुकरराव वडणारे यांचे प्रतिनिधी नरेश वडणारे यांचा सत्कार करण्यात आला.
आढावा बैठकीच्या यशस्वीत्तेकरीता, तालुका प्रमुख आर्वी योगेश उर्फ गुड्डू गावंडे, कारंजाचे संदिप टिपले, आष्टीचे चंद्रशेखर नेहारे, शहर प्रमुख आर्वी दिपक लोखंडे, कारंजाचे नितीन सरोदे, आष्टीचे विनायक हेडाऊ, शरद राजुरकर, मिलींद लंगडे, विजय गोलवे, अनिरुध्द देशपांडे, प्रकाश खांडेकर, मनिष अरसड, सर्व्हेश देशपांडे, अभय ढोले, निलेश उके, अनील करतारी, संगीता निघोट आदिंनी परिश्रम घेतले.
बैठकीत, प्रमोद घोडेस्वार, संजय निनावे, देवानंद केवट, धिरज लाडके, मारोतराव गुरूमळे, अनिल देशमुख, प्रमोद कडू, रामदास दापुरकर, सुनील एकोणकार, भोलेनाथ तायवाडे, दिपक वाकोडकार, प्रमोद खोंडे, मधुकर शेंडे, अजय धुर्वे, टेकशन बारंगे, मधुकर किनकर, आर.डी.लोखंडे, रामेश्वर खोंडे, हरिदास बोरवार, संजय तंतरपाडे, धर्मपाल वाटोकार आदि विभाग प्रमुख व शिवसैनीक मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.